पती गेले गं काठेवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पती गेले गं काठेवाडी
लेखन व्यंकटेश माडगुळकर
भाषा मराठी
देश भारत
विषय संगीत, विनोद
निर्मिती वर्ष १९६८
निर्मिती सुबक
गीत वसंत सबनीस
संगीत राहुल रानडे
नेपथ्य प्रदीप मुळ्ये
प्रकाशयोजना शीतल तळपदे
वेशभूषा मंगल केंकरे
कलाकार मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखिल रत्नपारखी, सिद्धेश जाधव, धम्मरक्षित रणदिवे, संतोष साळुंके, श्रीकांत वागदे

पेशवाईच्या काळात भांबुर्ड्यांच्या सर्जेराव शिंदे या सरदाराला काठेवाडला चौथाई वसुलीच्या मोहिमेवर पाठेविले जाते. त्याची पत्नी जानकी त्याचेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेते. काठेवाडचा राजा जोरावरसिंगला जेंव्हा हे कळते तेंव्हा तो जानकीचे पावित्र्य भंग करण्यासाठी ना-ना प्रकारच्या युक्त्या लढवितो. त्यापोटी निर्माण झालेला गोंधळ, गैरसमज यातूनच ही विनोदी नाट्यनिर्मिती होते.[ संदर्भ हवा ]