पणती
Appearance

हा लेख दिव्याचा एक प्रकार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पणती (निःसंदिग्धीकरण).
पणती हा एक दिव्याचा प्रकार आहे.
प्रस्तावना
[संपादन]खाद्यतेल वापरून प्रकाशमान होणारी पणती हा भारतातील फार प्राचीन काळापासून वापरात असलेला दिवा आहे.त्याचे परंपरेतील स्थान अबाधित आहे. देवळे, देव्हारा,तुळशी वृंदावने,स्वागत कमानी आणि दरवाजांचे कोनाडे वगैरे ठिकाणी पणती लावली जाते.पणतीचा उपयोग आरतीसाठी आणि ओवाळण्यासाठी केला जातो.
प्रथा व परंपरा
[संपादन]- काही सणांच्या दिवशी पणत्या नदी अथवा तलावात सोडण्याची प्रथा आहे.
- दिपावली सणाच्यावेळी पणत्या ओळीने अथवा विशिष्ट रचनेत लावूनरोषणाई केली जाते.
- सणासुदीला पणत्या सुंदर सजवून व रंगवून रचना करण्याची पद्धत आहे.
- देवघर आणि मंदिरांतून पितळ,चांदी इत्यादी धातूच्या समई किंवा निरांजने वापरली जातात.
- चोवीस तास जळणाऱ्या समईस नंदादीप असे संबोधले जाते.
- कार्यक्रमांच्या उद् घाटनाच्यावेळी समई प्रज्वलित करून कार्यक्रमांची सुरुवात करण्याची परंपरा आहे.
पणती चे प्रकार
[संपादन]- मातीची पणती
- पिठाची पणती
- निवडुंगाच्या खोडाची पणती
निवडुंगाच्या खोडाचा उपयोग दिपावलीच्या उत्सवात पणत्या बनविण्यासाठी केला जातो. विशेषतः पालघर जिल्ह्यातील बऱ्याच गावामध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी निवडुंगाच्या खोडाच्या पणत्या केल्या जातात.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार,२२ ऑक्टोबर २०२५