पंचशील तत्त्वे
Appearance
पंचशील याच्याशी गल्लत करू नका.
पंचशील तत्त्वे
[संपादन]१. प्रत्येक देशाच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे.
२. परस्पर आक्रमण न करणे.
३. एकमेकांच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप न करणे.
४. समानतेचा आणि परस्पर फायद्याचा आदर करणे.
५. शांततापूर्ण सहअस्तित्व.
महत्त्व
[संपादन]• शांतता टिकवणे:- या तत्त्वांमुळे युद्ध आणि संघर्ष टाळण्यास मदत होते.
• आंतरराष्ट्रीय सहकार्य:- विविध देशांदरम्यान विश्वास व सहकार्य निर्माण होतो.
• शीतयुद्ध काळातील भूमिका:- पंचशील तत्त्वांनी शीतयुद्धाच्या काळात निर्गुट चळवळीला प्रोत्साहन दिले.
• भारतीय परराष्ट्र धोरण:- पंचशील तत्त्वे भारतीय परराष्ट्र धोरणाचा कणा आहेत, ज्यावर भारताने शांतता व सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत.
1. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या नोंदी
- ^ India and China: The Five Principles of Peaceful Coexistence - वसंत साठे
- ^ https://www.mea.gov.in/uploads/publicationdocs/191_panchsheel.pdf