न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
| न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६ | |||||
| तारीख | ११ – ३१ जानेवारी २०२६ | ||||
| संघनायक | शुभमन गिल (आं.ए.दि.) सूर्यकुमार यादव (आं.टी२०) |
मायकेल ब्रेसवेल (आं.ए.दि.) मिचेल सँटनर (आं.टी२०) | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | न्यूझीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | विराट कोहली (२४०) | डॅरिल मिशेल (३५२) | |||
| सर्वाधिक बळी | हर्षित राणा (६) | क्रिस क्लार्क (७) | |||
| मालिकावीर | डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | सूर्यकुमार यादव (२४२) | ग्लेन फिलिप्स (१७६) | |||
| सर्वाधिक बळी | अर्शदीप सिंग (८) | जेकब डफी (६) | |||
| मालिकावीर | सूर्यकुमार यादव (भा) | ||||
जानेवारी २०२६ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[३][४]
२०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग म्हणून ह्या टी२० मालिकेचे आयोजन करण्यात आले होती.[५][६]
जून २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून या दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[७][८]
तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या परिणामी, न्यू झीलंडने भारतीय भूमीवर आपली पहिली एकदिवसीय मालिका जिंकली.[९]
संघ
[संपादन]| आं.ए.दि.[१०] | आं.टी२०[११] | आं.ए.दि.[१२] | आं.टी२०[१३] |
|---|---|---|---|
११ जानेवारी रोजी, दुखापतीमुळे ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली.[१४] १२ जानेवारी रोजी, वॉशिंग्टन सुंदरला डाव्या बरगडीच्या खालच्या भागाला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी आयुष बडोनीला संघात स्थान देण्यात आले.[१५] १६ जानेवारी रोजी, वॉशिंग्टन सुंदरला दुखापतींमुळे टी-२० मालिकेतूनही वगळण्यात आले आणि त्याच्या जागी रवी बिश्नोई व श्रेयस अय्यर यांना संघात सामील करण्यात आले.[१६]
२० जानेवारी रोजी, पहिल्या तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी क्रिस क्लार्कचा आंतरराष्ट्रीय टी२० संघात समावेश करण्यात आला.[१७]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- या मैदानावर खेळला गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१८][१९]
- रोहित शर्मा (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला.[२०]
- विराट कोहलीने (भा) २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या[२१] आणि कुमार संगकाराला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला.[२२]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेडन लेनॉक्स (न्यू) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- भारताच्या मोहम्मद सिराजचा हा ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.
- भारतामध्ये न्यूझीलंडचा हा पहिला एकदिवसीय मालिका विजय होता.[२३]
- या मैदानावर एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा हा पहिला पराभव होता.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि |
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- क्रिस क्लार्कने (न्यू) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- सूर्यकुमार यादवचा (भा) हा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[२४]
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- हा भारताचा मायभूमीवर खेळलेला १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. त्यामुळे, असे करणारा तो पहिला आशियाई संघही ठरला.[२५]
- आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना भारताचा हा संयुक्तपणे सर्वात मोठा यशस्वी विजय होता.[२६]
- आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २००-हून अधिक धावांचा पाठलाग करण्याचा हा सर्वात वेगवान विक्रमही होता.[२७]
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
४था आं.टी२० सामना
[संपादन]वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
५वा आं.टी२० सामना
[संपादन]वि |
||
- भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- सूर्यकुमार यादवने (भारत) याने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ३,००० धावा पूर्ण केल्या. तो आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये (खेळलेल्या चेंडूंनुसार) हा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान खेळाडू ठरला.[२८]
- ईशान किशनने (भारत) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण केल्या आणि पहिले शतकही झळकावले.[२९]
- अर्शदीप सिंगने (भारत) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीमध्ये प्रथमच पाच बळी घेतले.[३०]
- न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील ही भारताची सर्वोच्च धावसंख्या होती, ज्याने या मालिकेतील पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील २३८ धावांचा पूर्वीचा विक्रम मोडला.[३१]
नोंदी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ↑ "New Zealand to tour India for ODI and T20 series in जानेवारी २०२६" [जानेवारी २०२६ मध्ये न्यूझीलंड एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार.]. क्रिकेट स्कॅनर. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "BCCI confirms venues, schedule for New Zealand's white-ball tour" [बीसीसीआयतर्फे न्यूझीलंडच्या व्हाईट-बॉल दौऱ्याचे वेळापत्रक आणि ठिकाणे निश्चित]. क्रिकबझ्झ. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs NZ 2026 schedule out, 8 venues to host 3 ODIs & 5 T20Is" [भारत वि न्यूझीलंड २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ८ ठिकाणी ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामने होणार]. इनसाईड स्पोर्ट. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Men's Future Tours Program" [पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "India to warm-up for T20 World Cup 2026 with white-ball series against New Zealand" [२०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारत न्यूझीलंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिकेसह सराव करणार]. इंडिया टुडे. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Vadodara to host first men's international in 15 years during NZ tour of India" [भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान वडोदरा १५ वर्षांनंतर पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Update – 28th Apex Council Meeting" [अपडेट – २८वी सर्वोच्च समिती बैठक]. बीसीसीआय. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "BCCI announces venues for India's series against New Zealand, approves domestic season 2025-26" [बीसीसीआयची न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या मालिकेसाठी स्थळांची घोषणा, २०२५-२६ च्या देशांतर्गत हंगामाला मान्यता]. इंडिया टीव्ही. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs NZ ODI Series : टीम इंडियाला पराभवाचा धक्का! वनडे मालिका विजयासह न्यूझीलंड संघानं रचला इतिहास". लोकमत. १९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "India's squad for ODI series against New Zealand announced" [न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Gill left out of India's T20 World Cup squad; Rinku, Kishan make comebacks" [गिलला भारताच्या टी२० विश्वचषक संघातून वगळले; रिंकू आणि किशनचे संघात पुनरागमन.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Lennox earns first call-up ; Santner, Henry and Jamieson Return" [लेनॉक्सला पहिल्यांदाच संघात स्थान मिळाले; सँटनर, हेन्री आणि जेमिसनचे पुनरागमन.]. न्यूझीलंड क्रिकेट. 2026-01-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "New Zealand squads set for India tour as T20 World Cup looms" [टी२० विश्वचषक जवळ येत असताना, न्यूझीलंडचे संघ भारत दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs NZ वनडे मालिकेच्या काही तास आधी टीम इंडियात मोठा बदल; दुखापतीमुळे 'हा' खेळाडू बाहेर, बदली खेळाडूची घोषणा". लोकसत्ता. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Washington Sundar ruled out of ODI series; Ayush Badoni receives maiden call-up" [वॉशिंग्टन सुंदर एकदिवसीय मालिकेतून बाहेर; आयुष बडोनीला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान.]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Shreyas and Bishnoi added to India's squad for NZ T20I series" [न्यूझीलंडविरुद्धच्या आं.टी२० मालिकेसाठी श्रेयस आणि बिश्नोई यांचा भारतीय संघात समावेश.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Clarke staying on for India T20s" [क्लार्क भारताच्या टी-२० मालिकेसाठी कायम]. न्यूझीलंड क्रिकेट. 2026-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Vadodara to host men's ODI after 16 years!" [१६ वर्षांनंतर वडोदरा येथे पुरुषांचा एकदिवसीय सामना होणार!]. टाइम्स ऑफ इंडिया. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Vadodara Welcomes Back Men's International Cricket After 15 Years" [१५ वर्षांनंतर वडोदरा येथे पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन]. क्रिकेट स्टेडियम. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "रोहित शर्माचा जागतिक विक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 'षटकार' ठोकणारा जगातील एकमेव खेळाडू". पुढारी. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Virat Kohli Becomes 3rd Batter In The World To Score 28,000 Runs In International Cricket" [विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज.]. न्यूज १८. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त..." लोकमत. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "न्यूझीलंडचा भारतात पहिला वनडे मालिका विजय! टीम इंडियाचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव; विराटचं शतक ठरलं व्यर्थ". लोकसत्ता. १९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Suryakumar Yadav becomes 4th Indian to play 100 T20I matches" [सूर्यकुमार यादव १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला.]. स्पोर्टस्टार. २२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "India Beat Pakistan And Bangladesh, Become 1st Asian Team To..." [पाकिस्तान आणि बांगलादेशला हरवून भारताने पहिला आशियाई संघ बनण्याचा मान मिळवला...]. न्यूज१८. २३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Raipur T20I: Ishan-daar, Surya-uday again as India race to 209 in world record chase" [रायपूर टी२०: ईशानची शानदार खेळी, सूर्याचा पुन्हा उदय; विश्वविक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची २०९ धावांपर्यंत मजल]. इंडिया टूडे. २३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs NZ: India breaks Pakistan's record for fastest 200-plus chase in T20I history" [भारत विरुद्ध न्यूझीलंड: भारताने मोडला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात २००-हून अधिक धावांचा पाठलाग सर्वात जलद गतीने करण्याचा पाकिस्तानचा विक्रम.]. स्पोर्ट्स्टार. २३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "IND vs NZ: Suryakumar Yadav surpasses Virat Kohli and Rohit Sharma, becomes fastest to..." [भारत वि न्यूझीलंड: सूर्यकुमार यादवने विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकले, सर्वात जलद...]. [द टाइम्स ऑफ इंडिया]]. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Ishan Kishan hits maiden T20I century on Sanju Samson's turf, makes himself indispensable for World Cup XI" [इशान किशनने संजू सॅमसनच्याच भूमीवर आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावले आणि विश्वचषक संघासाठी स्वतःला अपरिहार्य सिद्ध केले.]. हिंदुस्तान टाइम्स. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "India vs New Zealand Highlights, 5th T20I: Kishan ton, Arshdeep fifer give IND 46-run win, series victory" [भारत विरुद्ध न्यूझीलंड क्षणचित्रे, पाचवा टी२०: किशनचे शतक, अर्शदीपच्या पाच बळींच्या जोरावर भारताचा ४६ धावांनी विजय, मालिकाही जिंकली]. स्पोर्टस्टार. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Stats: India match sixes record in second-half mayhem" [आकडेवारी: दुसऱ्या हाफमधील धुमाकुळात भारताने षटकारांचा विक्रम मोडला.]. क्रिकबझ्झ. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]

