न्यू जॉर्जिया द्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्यू जॉर्जिया द्वीप सॉलोमन द्वीपसमूहाच्या पश्चिम प्रांतातील सगळ्यात मोठे बेट आहे. न्यू जॉर्जिया द्वीपसमूहात असलेले हे बेट साधारण ७२ किमी (४५ मैल) लांबीचे असून याच्या बहुतांश भागावर कठीण पर्वत आणि घनदाट जंगल आहे.

दुसऱ्या महायुद्धातील न्यू जॉर्जिया मोहीम जून-ऑक्टोबर १९४३ दरम्यान अमेरिकेने जपानी सैन्याविरुद्ध या बेटावर केलेली चढाई होती. याशिवाय कॉरल समुद्राची लढाई तसेच कुला आखाताची लढाई या द्वीपाच्या आसपास लढल्या गेल्या होती.