न्यूटाउन (बक्स काउंटी)
| स्थापना | 1684 |
|---|---|
| अधिकृत नाव | Newtown |
| देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | बक्स काउंटी (पेनसिल्व्हेनिया) |
| भौगोलिक गुणक | ४०°१३′४२″N ७४°५५′५६″W |
| सीमा सामायिक करणे | Newtown Township |
| डाक संकेतांक | 18940 |


न्यूटाउन हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील बक्स काउंटीमधील एक बोरो आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,२६८ इतकी होती.[१] हे शहर ट्रेंटन, न्यू जर्सी महानगर क्षेत्राच्या पश्चिमेस आणि मोठ्या फिलाडेल्फिया महानगर क्षेत्राचा एक भाग आहे. हे शहर पूर्णपणे न्यूटाउन टाउनशिपने वेढलेले आहे, ज्याच्यापासून १८३८ मध्ये ते वेगळे झाले. शहरातील स्टेट स्ट्रीट हा रुंद पदपथ, दुकाने, टॅव्हर्न आणि उपाहारगृहांनी सजलेला मुख्य व्यावसायिक मार्ग आहे.
इतिहास
[संपादन]न्यूटाउनची स्थापना १६८४ मध्ये विल्यम पेनने केली. फिलाडेल्फिया शहराच्या आसपास पेनने शहरातील रहिवाशांना ग्रामीण भागातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतीला पाठबळ देण्यासाठी उभारलेल्या शहरांपैकी न्यूटाउन हे एक होते.
१७२६ पासून १८१३ पर्यंत न्यूटाउन हे बक्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र होते. १८१३ मध्ये अधिक मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉइलस्टाऊन शहराकडे हे मुख्यालय हलवण्यात आले. २६ डिसेंबर १७७६ रोजी ट्रेंटनच्या लढाईनंतर आणि प्रिन्सटनच्या लढाईपूर्वी खंडीय सेनेचे सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी न्यूटाउन येथे आपले मुख्यालय स्थापन केले होते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Census - Geography Profile: Newtown borough, Bucks County, Pennsylvania". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. ८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.