Jump to content

नोरेन सिंग नहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नोरेन सिंग नहार - (जन्म - १ डिसेंबर १९२०, मृत्यू - ११ सप्टेंबर २०१३) [] श्रीअरविंद आश्रमाच्या टपाल तिकीट विभागाचे प्रमुख होते. १९९०-१९९२ पर्यंत टपाल तिकिट सल्लागार समितीचे सदस्य होते.

जीवन व कार्य

[संपादन]

१९३९ मध्ये ते श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरीमध्ये सामील झाले. त्यानंतर आश्रमाच्या टपाल तिकिट संग्रह विभागाच्या संग्रहात मोठा विकास झाला आणि त्यांची बहीण सुप्रभा नहार यांच्या मदतीने त्यांनी त्याचे जतन केले. त्यांनी १९७५ मध्ये फ्रान्सला भेट दिली आणि आंतरराष्ट्रीय टपाल तिकिट प्रदर्शनात भाग घेतला. त्यांनी टपाल तिकिटांसाठी इंडिया पोस्ट, जर्नल ऑफ इंडिया स्टडी सर्कलमध्ये भारतातील फ्रेंच वसाहतींच्या टपाल तिकिटांबद्दल अनेक लेख लिहिले होते. []

सन्मान

[संपादन]

त्यांना इंडो-फ्रेंच फिलाटेलिक और न्यूमिस्मेटिक असोसिएशनतर्फे जीवन-गौरव पुरस्कार देण्यात आला होता. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ The Passing of Noren Singh Nahar, Overman foundation
  2. ^ a b "Honoring Philatelists". stampsofindia.com. 2025-03-05 रोजी पाहिले.