Jump to content

नेहा किरपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Neha Kirpal (es); নেহা কিরপাল (bn); Neha Kirpal (sq); Neha Kirpal (nl); Neha Kirpal (ga); നേഹ കൃപാൽ (ml); Neha Kirpal (ast); Neha Kirpal (en); नेहा किरपाल (mr); ᱱᱮᱦᱟ ᱠᱤᱨᱯᱟᱞ (sat); ਨੇਹਾ ਕਿਰਪਾਲ (pa); নেহা কিৰপাল (as); నేహా కిర్పాల్ (te); نیہا کرپال (pnb); நேகா கிர்பால் (ta) सामाजिक आणि सांस्कृतिक उद्योजक (mr); Social and Cultural Entrepreneur from India (en); entamadora india (ast); ഇന്ത്യൻ വ്യവസായ പ്രമുഖ (ml); Indiaas zakenvrouw (nl) நேகா கிருபாள் (ta)
नेहा किरपाल 
सामाजिक आणि सांस्कृतिक उद्योजक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडन
  • सरदार पटेल विद्यालय
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नेहा किरपाल ह्या एक भारतीय सामाजिक उद्योजिका आहेत. कला आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान हे त्यांची ओळख आहे. त्यांनी २००८ मध्ये इंडिया आर्ट फेरची स्थापना केली,[][] याच बरोबर त्या अमाहा नामक मानसिक आरोग्य संस्थेच्या सह-संस्थापिका देखील आहेत.[] भारत सरकार तर्फे त्यांना महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. []

प्रारंभिक आयुष्य आणि शिक्षण

[संपादन]

किरपाल यांचा जन्म नवी दिल्ली, भारत येथे झाला. दिल्लीतच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. इथून त्यांनी सरदार पटेल विद्यालय येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.[] नंतर दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले.[] त्या आपल्या शालेय आणि विद्यापीठाच्या काळात SPIC MACAY मध्ये सहभागी होत्या.[] त्यांनी लंडन विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.[][]

किरपाल यांनी २००८ मध्ये इंडिया आर्ट फेर (पूर्वीचे इंडिया आर्ट समिट) ची स्थापना केली. हा मेळा समकालीन कलेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखला जातो.[][१०] भारतातील कला बाजारपेठ पुनरुज्जीवित करण्याचे श्रेय किरपाल यांना दिले जाते.[] ऑगस्ट २०१७ मध्ये, त्यांनी कंपनीतील १०% हिस्सा आपल्याकडे राखून राजीनामा दिला.[११] एका दशकानंतर, त्यांनी आपला कला व्यवसाय स्वित्झर्लंड मधील एमसीएच ग्रुपला विकला.[१२][१३]

किरपाल यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या कलाविषयक राष्ट्रीय सल्लागार समितीवर देखील काम केले.[१४]

२०१९ मध्ये, किरपाल अमित मलिकसोबत अमाहा हेल्थ (पूर्वीचे इनरअवर) मध्ये सामील झाल्या. अमाहा हेल्थ ही एक मानसिक आरोग्य संस्था आहे जी संपूर्ण भारतात मानसिक उपचार प्रदान करते.[][१५][१६]

२०२४ मध्ये किरपाल यांनी डॉ. नंदिनी मुरली यांच्यासोबत "मेंटल हेल्थ: लिव्हड एक्स्पेरियन्स ऑफ रेसिलेन्स अँड होप" या पुस्तकाचे सह-लेखन केले.. [१७]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

२०१२ मध्ये, किरपालचा इंडिया टुडेच्या २५ पॉवर वुमनच्या यादीत समावेश करण्यात आला.[१८] २०१४ आणि २०१५ मध्ये, फॉर्च्यून इंडियाने किरपाल यांना त्यांच्या ४० वर्षांखालील ४० च्या यादीत समाविष्ट केले.[१९][२०] [२१] २०१४ मध्ये, त्यांना इंडिया टुडे कडून सर्वात शक्तिशाली महिला पुरस्कार मिळाला. [२२] बिझनेस टुडे मासिकाने किरपाल यांना २०१२-१४ साठी "व्यवसायातील सर्वात शक्तिशाली महिला" म्हणून घोषित केले.[२३][२४][२५] २०१४ साली, फोर्ब्स इंडिया आर्ट अवॉर्ड्समध्ये किरपाल यांना वर्षातील सर्वोत्तम कला उद्योजक म्हणून गौरवण्यात आले.[२६]

२०१५ मध्ये किरपाल यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे दिला जातो. जागतिक महिला दिनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.[] त्याच वर्षी त्यांनावर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारतातील यंग ग्लोबल लीडर म्हणून घोषित केले आणि [२७] त्यांनाएनडीटीव्ही ने २०१५ चा इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले.[२८] २०१७ मध्ये, किरपाल अपोलो मासिकाच्या "४० अंडर ४० ग्लोबल" मध्ये होत्या.[२९]

किरपाल ह्या अनंता अस्पेन सेंटरच्या कमलनयन बजाज फेलोशिपची फेलो आहे.[३०] २०१८ मध्ये, त्यांची आयझेनहॉवर इनोव्हेशन फेलो म्हणून निवड झाली. [३१] सीएनबीसी टीव्ही१८ने २०२४ मध्ये 'फ्यूचर फीमेल फॉरवर्ड' च्या दुसऱ्या सीझनमध्ये लिंग समानतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांची दखल घेतली.[३२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Mishra, Arunima (August 31, 2014). "Neha Kirpal is behind the revival of Indian art market". बिझनेस टुडे. 30 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ Tripathi, Shailaja (February 9, 2013). "A fair share". द हिंदू. December 9, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ a b Ashrafi, Md Salman (January 9, 2024). "Mental health startup Amaha raises $4.4 Mn in Series A". Entrackr. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  4. ^ a b Jain, Shantanu (March 10, 2015). "Neha Kirpal, Director, India Art Fair receives Nari Shakti Award from the President". बिझनेस वर्ल्ड. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  5. ^ Sethi, Sunil (January 22, 2016). "Lunch with BS: Neha Kirpal". Business Standard. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  6. ^ a b Singh, Shalini (December 25, 2016). "Empress of art". द वीक. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  7. ^ Parul (January 21, 2011). "Bringing art home". India Today. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Neha Kirpal". asia.wowawards.com (इंग्रजी भाषेत). 2020-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-03 रोजी पाहिले.
  9. ^ East, Ben (January 31, 2013). "The India Art Fair attracts 1,000 artists from around the world". The National (Abu Dhabi).
  10. ^ Punj, Shweta (October 14, 2012). "Neha Kirpal is riding high on the success of India Art Fair". बिझनेस टुडे. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  11. ^ Shaw, Anny (August 18, 2017). "India Art Fair gets new director for tenth edition". The Art Newspaper. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  12. ^ Kuruvilla, Elizabeth (September 13, 2016). "Art Basel parent company co-owns India Art Fair". Livemint.
  13. ^ Kalra, Vandana (April 24, 2022). "As India Art Fair returns, a brief history of art fairs and their significance". इंडियन एक्स्प्रेस. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "Neha Kirpal | Art Business Conference" (इंग्रजी भाषेत). 18 July 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-03 रोजी पाहिले.
  15. ^ "Mind over art". Mumbai Mirror. April 6, 2020.
  16. ^ "'There is mental illness in every home today,' says co-founder of a mental health startup". CNBC TV18. February 10, 2024. 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  17. ^ "Westland Books Acquires Neha Kirpal And Dr Nandini Murali's Latest Book On Mental Health". OneIndia. 2 June 2024. 3 September 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 Nov 2024 रोजी पाहिले.
  18. ^ "25 power women and their inspiring stories". India Today. March 31, 2012. 30 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  19. ^ "7 women make it to Fortune India's 40 under 40 list". Rediff.com. March 11, 2014. 30 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  20. ^ "Seven women in Fortune India's 40 under 40 list". Business Standard. March 17, 2015. 30 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  21. ^ "40 Under 40: 2015". Fortune India. 2015.
  22. ^ Ghunawat, Virendrasingh (August 14, 2014). "Business Today awards Ekta Kapoor, other leaders for corporate excellence". India Today. 30 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  23. ^ "Most Powerful Women in Business 2012". Business Today. September 20, 2012. 30 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  24. ^ "Most Powerful Women in Business 2013". Business Today. August 27, 2013.
  25. ^ "Most Powerful Women in Business 2014". Business Today. August 11, 2014. 30 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  26. ^ "Winners For 2014". Forbes India. 2014. 1 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  27. ^ "World Economic Forum names Smriti Irani as Young Global Leader from India". The Economic Times. March 17, 2015. 9 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  28. ^ "Art Isn't Just For the Elite, Says Neha Kirpal". NDTV. February 2, 2016. 15 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  29. ^ "40 Under 40 Global". apollo-magazine.com. September 7, 2017. 22 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  30. ^ "Kamalnayan Bajaj Fellows". 29 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2024 रोजी पाहिले.
  31. ^ "Eisenhower Fellowships Welcomes 21 Innovators from Around the World". Eisenhower Fellowships. September 24, 2018. 12 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.
  32. ^ "A list of all the women felicitated at the launch event". CNBC-TV18. February 10, 2024. 30 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2024 रोजी पाहिले.