नेपोलियन अल्मीडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


नेपोलियन अल्मीडा हे अाॅस्ट्रेलियात राहणारे एक मराठी नाट्यनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत.

अल्मीडा यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांचे वडील एक शिक्षक होते. ते नेहमी मुलांना पुस्तके वाचायला प्रोत्साहन देत असत. त्यामुळे नेपोलियनमध्येही नाट्यविद्या आणि नाटकांच्या बाबतीत अधिकाधिक वाचायची प्रवृत्ती निर्माण झाली. लहान वयातच त्यांनी अभिनयाची सुरुवात केली.त्यानंतर नाट्याध्ययनाच्या कार्यशाळा, शिबिरे यांमध्ये भाग घेऊन नेपोलियन अल्मीडा यांनी औपचारिक नाट्यशिक्षण घेतले.

पुढे अल्मीडा यांनी आॅस्ट्रेलियाचे रहिवासी झाल्यावर नूतन मंडल, जीवनदर्शन, जीवन-ज्योती, सेंट झेवियर्स क्लब आदींच्या नाटकांत अभिनय करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्यांनी सिडनी शहरातील मराठी मंडळाची नाटके बसवली आणि त्यांमध्ये अभिनय केला. त्यांच्या नाटकांत त्यांच्याखेरीज नीलिमा बेर्डे, चिन्मय अभ्यंकर मंदार पाठक, मानसी गोरे, अपूर्वा आठवले, आॅलिव्हिया अल्मीडा (सर्व आॅस्ट्रेलिया-निवासी), इ.चा सहभाग असतो. हे सर्वजण नाटकांमध्ये मानधनाशिवाय कामे करतात. नाटकेही अ-मराठी मुलखांत सादर होत असल्याने प्रेक्षकांसाठी बह्वंशी बिनातिकीट असतात. आॅस्ट्रेलियातील हे मराठी मंडळ शाळांमधून, नभोवाणीवरून आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांतून आॅस्ट्रेलियात मराठी संस्कृती जागृत ठेवण्यास प्रोत्साहित करते. मंडळाची स्थापना इ.स.१९९१मध्ये झाली आहे.

त्यांच्या नाटकांचे आॅस्ट्रेलियाखेरीज भारतातील अगरतळा, अहमदाबाद, इम्फाळ, कलकत्ता, गुवाहाटी, चंदीगड, चेन्नई, जम्मू, जयपूर, त्रिवेंद्रम, दिल्ली, पाटणा, बनारस, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, मुंबई, इ शहरांत प्रयोग झाले आहेत.

नेपोलियन अल्मीडा आणि मंडळी दरवर्षी एक नवीन नाटक बसवतात. आजवर त्यांनी 'घाशीराम कोतवाल', 'मला काही सांगायचंय', 'दुर्गा झाली गौरी', 'सुखांशी भांडतो आम्ही' आदी नाटके रंगमंचावर सादर केली आहेत.

अल्मीडा व्यवसायाने अभियंता आहेत.