नूतन वर्ष संध्या
"नूतन वर्ष संध्या" हा एक सामाजिक स्नेहमेळावा स्वरूपाचा कार्यक्रम जगभरात साजरा केला जातो.[१]
स्वरूप
[संपादन]३१ डिसेंबर हा ग्रेगोरियन कालगणनेचा वर्षातला शेवटचा दिवस आहे.[२] पुढच्या दिवशी १ जानेवारीला नवे ग्रेगोरियन वर्ष सुरू होते.[३] ग्रेगोरियन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी जगभरात जल्लोष साजरा केला जातो.[४] ख्रिस्ती धर्मातील नाताळ उत्सवाचा हा सातवा दिवस असतो.[५] जगभरात साजरा होणारा हा दिवस भारतातही उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. या संध्याकाळी समूहाने लोक एकत्र येऊन खाणे, पेय पिणे, नृत्य करणे, संगीताचे कार्यक्रम, मनोरंजनाचे खेळ खेळणे अशा कार्यक्रमांचा आनंद घेतात.[६]
विविध देशात
[संपादन]जगातील विविध देशात ३१ डिसेंबरची संध्याकाळ सरत्या वर्षाला निरोप देत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
येथे नूतन वर्ष संध्या कुटुंब आणि मित्र परिवार यांच्यासह साजरी करतात. मोठ्या शहरात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू असतात. त्यांमध्ये नृत्य, गायन यांचा समावेश असतो. रात्री १२ वाजता आतषबाजी केली जाते. मार्टियर मेमोरियल या ठिकाणी यावेळी जास्त गर्दी असते. रात्री ८ वाजता राष्ट्राध्यक्ष सर्व नागरिकाना संदेश आणि शुभेच्छा देतात. नवीन वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी एक विशिष्ट प्रकारचा केक आणि काळी कॉफी पिण्याची येथे पद्धती आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लहान मुले आपले आई-वडील आणि अन्य नातेवाईक यांना हाताने लिहून शुभेच्छापत्रे देतात.[७]
- इजिप्त -
इजिप्तमध्ये कैरो या राजधानीच्या शहरात मोठ्या उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाती. या देशातील प्रसिद्ध कलाकार यावेळी आपली कला सादर करतात. त्याचे विशेष कार्यक्रम योजले जातात. आतषबाजी केली जाते.[८]
- दक्षिण सुदान-
नवीन वर्ष स्वागतासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी दक्षिण सुदान मधील नागरिक चर्चला भेट देतात. रात्री ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तेथे कार्यक्रम होतो, रात्री १२ च्या ठोक्याला सगळेजण एकत्र मिळून नववर्ष स्वागताचे गीत गातात. रात्री १२.३० वाजता हा कार्यक्रम संपतो. १ जानेवारी रोजी शाळा, शासकीय संस्था यांना सुट्टी जाहीर केलेली असते.[९]
नूतन वर्ष स्वागत संध्येला मोठ्या प्रमाणावर आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य आहे. ब्राझीलमध्ये या दिवशी विशेष सुट्टी जाहीर होते. परंपरा विचारात घेता ब्राझील मधील नागरिक घरात किंवा उपहारगृहात एकत्र जेवण घेतात. या दिवशी त्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होतात. समुद्रकिनारी पांढ-या रंगाचा पोशाख घालून हे लोक नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करतात. काही समुद्रकिनारी संगीताचे विशेष कार्यक्रम योजले जातात.[१०]
येथे नवीन वर्षाचे स्वागत बर्फावरील हॉकीचा खेळ खेळून केले जाते. घरात आणि समाजात लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात.
नाताळनंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा नॉर्वे येथील उत्सव म्हणजे नूतन वर्ष स्वागत संध्या. येथे नाताळ हा कौटुंबिक तर नवीन वर्ष स्वागत हा सामाजिक सोहळा मानला जातो. टर्की नावाचा पारंपरिक पदार्थ या दिवशी आवर्जून केला जातो. व्हॅनिला पुडिंग तसेच आईस्क्रीमचे विविध प्रकार केले जातात. मद्यपान केले जाते. आतषबाजी केली जाते.[११]
- इंग्लंड -
मध्य लंडन शहरात मध्यरात्री होणारी आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य मानले जाते. २०१० साली येथील सुमारे ८ मिनिटे सुरू असलेली रोषणाई आणि आतषबाजी पाहण्यास सुमारे २५,००० लोक एकत्र झाले होते.[१२]
- भारत-
भारतात पारंपरिक नवीन वर्ष वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुरू होते, असे असले तरी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी कुटुंबात आणि सामूहिक स्वरूपात एकत्र येऊन नव्या ग्रेगोरियन वर्षाचे स्वागत केले जाते. यामध्ये तरुण मंडळींचा उत्साह अधिक असतो.[६]
हे ही पहा
[संपादन]चित्रदालन
[संपादन]-
रिओ येथील सोहळा
-
लास वेगास येथील रोषणाई आणि आतषबाजी
संदर्भ
[संपादन]- ^ "नए साल पर चढ़ेगा बॉलीवुड का खुमार, होटल्स और क्लब तैयार". www.patrika.com (hindi भाषेत). 2018-12-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Win calendar". https://www.wincalendar.com. 30.12.2019 रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ New Year's Celebrations (इंग्रजी भाषेत). In the Hands of a Child.
- ^ "Welcome 2020 in style: the coolest New Year parties in Delhi NCR". 27.12.2019. 30.12.2019 रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Green, Jonathan (2009). Christmas Miscellany: Everything You Always Wanted to Know about Christmas (इंग्रजी भाषेत). Skyhorse Publishing Inc. ISBN 9781602397576.
- ^ a b McCulloch, Victoria; Stott, David (2013-10-30). Goa (with Mumbai) Footprint Focus Guide (इंग्रजी भाषेत). Footprint Travel Guides. ISBN 978-1-909268-42-5.
- ^ "new year's eve in algeria 2019". https://www.skiddle.com. 30.12.2019 रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "NEW YEAR'S EVE IN EGYPT, AN EXTRAVAGANZA OF STARS". http://www.egypt.travel. 30.12.2019 रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "New Year in South Sudan". https://www.timeanddate.com. 30.12.2019 रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ Hollander, Malika (2002-10-31). Brazil: The Culture (इंग्रजी भाषेत). Crabtree Publishing Company. ISBN 978-0-7787-9340-3.
- ^ "New years eve in Norway". https://www.baltictravelcompany.in. 2019-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30.12.2019 रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "London Eye fireworks mark new year 2011". BBC News. 1.1.2011. 30.12.2019 रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)