Jump to content

नूतन गंधर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नूतन गंधर्व ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे (जन्म : संकेश्वर-बेळगाव जिल्हा, २८ जानेवारी १९२५; - ३ सप्टेंबर २०१०) हे एक मराठीभाषक शास्त्रीय संगीत गायक होते.

वयाच्या ६व्या वर्षी गायला सुरुवात केलेल्या अप्पासाहेबांनी कागलकरबुवा, जगन्नाथबुवा पुरोहित, निवृत्तीबुवा सरनाईक, भुर्जीखाँसाहेब अशा गुरूंकडून २२ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले. आग्रा, किराणा आणि जयपूर या तीनही घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली होती.

१९५६साली नवी दिल्ली येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर अप्पासाहेब देशपांडे यांचे एका खास मैफिलीत गाणे झाले होते.

नूतन गंधर्व हे बाल गंधर्वांना आदर्श मानीत. गंधर्वांची गीते गाण्यात नूतन गंधर्व आघाडीवर होते. हे पाहून, १९५८मध्ये संकेश्वरचे शंकराचार्य यांनी अप्पासाहेबांना नूतन गंधर्व ही उपाधी दिली.

कोल्हापुरातल्या पद्मावती संगीत विद्यालयात नूतन गंधर्वांनी शेकडो विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरच्या संत कै. बाळुमामा महाराजांचा नूतन गंधर्वांना आशीर्वाद होता. त्यांच्या समोर त्यांचे गाणे झाले होते.

पुरस्कार

[संपादन]
  • कोल्हापूर भूषण (इ.स. २०००)
  • करवीर पुरोहित पुरस्कार (इ.स. २००१)
  • बसव पुरस्कार (१९९९)