नीरद सी. चौधरी
Appearance
नीरद चंद्र चौधरी (बंगाली: নীরদ চন্দ্র চৌধুরী; २३ नोव्हेंबर, इ.स. १८९७:किशोरगंज, बांगलादेश - १ ऑगस्ट, इ.स. १९९९:लॅथबरी रोड, ऑक्सफर्ड, इंग्लंड) हे बंगाली आणि इंग्लिश लेखक होते. त्यांनी बंगालीमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृतीबद्दल लेखन केले. त्यात बंगालमधील ब्रिटिश राजवटीचे अनेक उल्लेख आहेत. त्यांचे ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन अननोन इंडियन हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले. त्यांच्या द कॉंटिनेंट ऑफ सर्क या कादंबरीला डफ कूपर मेमोरियल अवॉर्ड दे्यात आला होता. चौधरी यांनी लिहिलेल्या स्कॉलर एक्सट्राऑर्डिनरी या मॅक्स म्युलरच्या चरित्रास साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला.