नीरजा भनोत पुरस्कार
Appearance
नीरजा भनोत पुरस्कार हा भारतातील नीरजा भनोत-पॅन ॲम ट्रस्टतर्फे वर्षातून एकदा देशातील अशा महिलेला दिला जाणारा सन्मान आहे, जिने सामाजिक अन्यायाचा धैर्याने आणि निर्धाराने सामना केला आहे आणि तशाच परिस्थितीत असलेल्या इतर महिलांना मदतीचा हात दिला आहे.[१] वार्षिक नीरजा भानोत पुरस्काराची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. सप्टेंबर १९८६ मध्ये पाकिस्तानातील कराची विमानतळ येथे पॅन ॲम फ्लाइट ७३ च्या विमान अपहरणादरम्यान स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वरिष्ठ विमान परिचारिका नीरजा भनोत यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात १.५ लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि ट्रॉफी (स्मृतीचिन्ह) यांचा समावेश असतो.[२]
पुरस्कार प्राप्त व्यक्ती
[संपादन]- १९९१ - पूर्णिमा साधना, साधना पवार
- १९९२ - सत्य राणी चड्ढा, अमृता अहुवालिया
- १९९३ - शहनाज शेख
- १९९४ - भंवरी देवी
- २००१ – यशोदा एकंबरम[३]
- २००२ - ॲलिस गर्ग, फ्लाविया ॲग्नेस
- २००३ – शिवानी गुप्ता[४]
- २००४ – मंगला पाटील[४]
- २००८ – चंदा असानी[५]
- २०१२ – आशा मनवानी[६]
- २०१४ – रश्मी आनंद[७]
- २०१५ – सुभाषिनी वसंत[८]
- २०१६ - सिंधुताई सपकाळ
- २०१७ - डॉ. सरोजिनी अग्रवाल
- २०१९ - शिफिया हनीफ (केरळ)
संदर्भ
[संपादन]- ↑ "Neerja Bhanot Pan Am Trust – Neerja Awards". Neerja Bhanot Pan Am Trust. 2010. 2013-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "Neerja Bhanot Award conferred". The Indian Express. Indian Express Limited. 17 December 2012. 5 September 2013 रोजी पाहिले.
- ↑ Viswanathan, S (13–26 October 2001). "A profile of courage". Frontline. The Hindu Group. 5 September 2013 रोजी पाहिले.
- 1 2 "Neerja Bhanot award for two brave women". The Times of India. The Times Group. 2 September 2004. 5 September 2013 रोजी पाहिले.
- ↑ "Mumbai based Chanda Asani to get Neerja Bhanot Award 2008". Business Standard. 16 September 2008. 5 September 2013 रोजी पाहिले.
- ↑ Gyanesh, Aditi (17 December 2012). "Asha wins Neerja Bhanot Award for empowering women". The Times of India. 20 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 September 2013 रोजी पाहिले.
- ↑ "Delhi-based activist wins Neerja Bhanot Award". The Indian Express. Indian Express Limited. 20 July 2014. 10 February 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Neerja Bhanot Award given to Subhashini Vasanth". The Times of India. The Times Group. 14 January 2016. 10 February 2016 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]* नीरजा भानोत - अधिकृत संकेतस्थळ