निशाचर प्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिवसा झोपून रात्री संचार करणाऱ्या प्राण्यांना निशाचर प्राणी असे म्हणतात. उदा . कोल्हे, लांडगे, काही साप इ .

निशाचर = निशा (रात्र) + चर (चालणे)

निशाचर म्हणजे रात्री सुद्धा जागा असणारा सजीव.

वैशिष्ट्ये[संपादन]

हे सकाळी झोपलेले असतात, आणि रात्री यांची सकाळ होते, त्यावेळेस ते अन्न खाद्यपदार्थ शोधण्यासाठी बाहेर पडतात. रात्रीच हे वावरत असल्याने यांची दृष्टी इतर प्राण्यांपेक्षा रात्रीसाठी विकसित झालेली असते. त्यामुळे रात्री फिरताना यांना इतर सजीवांपेक्षा स्पष्ट दिसू शकते.

रात्रीच्या काळोखात त्यांना कोणताही अडसर येऊ नये म्हणून काही प्राण्यांमध्ये त्यांचे काही अवयव अजून विकसित झालेले असतात. जसे की मांजरीमध्ये त्यांचे कान, वटवाघूळ, साप, मध्ये इको लोकेशन, घुबडाचे मोठे डोळे, इत्यादी याची उदाहरणे आहेत. हल्ली शहरात वाढत्या लाईटच्या वापरामुळे या प्राण्यांना धोका असल्याचं आढळून आलं आहे. ज्याला "लाईट पोल्युशन" असं म्हणतात.