Jump to content

निल्झा वांगमो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
নীলজা ওয়াংমো; निल्जा वांगमो; Nilza Wangmo; Nilza Wangmo; Nilza Wangmo; निल्झा वांगमो; ᱱᱤᱞᱡᱟ ᱣᱟᱝᱢᱚ; ਨੀਲਜ਼ਾ ਵੈਂਗਮੋ; নীলজা ৱাংমো; Nilza Wangmo; నిల్జా వాంగ్మో; நில்சா வாங்மோ; Indian restaurant owner; Indiaas zakenvrouw; Indian restaurant owner; ভারতীয় রেস্তোরাঁর মালিক; भारतीय रेस्तरां के मालिक और महिला उद्यमी (जन्म: 1979); empresaria india
निल्झा वांगमो 
Indian restaurant owner
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखc. इ.स. १९७९
अलची
नागरिकत्व
व्यवसाय
  • businesswoman
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

निल्झा वांगमो (जन्म:१९७९[] - हयात) ह्या एक भारतीय उपहारगृहच्या मालक आहेत. वांगमो यांना उत्तर भारतातील लडाख प्रदेशातील स्थानिक/पारंपरिक अन्नाची आवड आहे. त्या आपल्या उपहारगृहात पारंपरिक आणि आधुनिक अन्नपदार्थांचा मेळ जुळवून ग्राहकाला वाढतात.[] २०१९ मध्ये त्यांच्या या कामासाठी भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार - नारी शक्ती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.[]

जीवन

[संपादन]

वांगमोचा जन्म सुमारे १९७९ मध्ये अलची येथे झाला. त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या आईच्या वडिलांनी त्यांना आपल्या जवळ ठेवून घेतले आणि स्टोक या डोंगराळ गावात त्यांचे पुढील संगोपन झाले. त्यांच्या आई एका एनजीओमध्ये अल्प पगारावर काम करत असे. त्यामुळे वांगमोचे शिक्षण एका मिशनरी शाळेत झाले.[] घरात पैशांची मोठी चणचण होती ज्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणे अवघड झाले होते. त्यांच्या वडिलांच्या कुटुंबाने त्यांना आपल्या घरात घेण्यास नकार दिला. त्यांच्या आईच्या वडिलांनी वांगमो आणि तिच्या आईसाठी अलची येथे घर बांधण्यास आर्थिक सहकार्य केले, यामुळे या मायलेकीच्या निवाऱ्याची सोय झाली.[] दुर्दैवात भर म्हणून २०१४ साली त्यांच्या आईच्या वडिलांचे निधन झाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद निलझा वांगमो यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करताना

वांगमोने २०१६ मध्ये कर्ज काढून "अलची किचन" नावाचे एक उपहारगृह सुरू केले. हे उपाहारगृह त्यांच्या घराच्या वर असून पर्यटकांना ट्रेकिंग करून उपहारगृहापर्यंत जावे लागते. विशेष म्हणजे ही बाब पर्यटकांच्या आवडीस पात्र ठरली. वांगमो यांना आपल्या उपहारगृहाची फारशी जाहिरात करावी लागली नाही. उलट अवघ्या तीन वर्षांत तोंडी प्रसिद्धीने त्यांची प्रसिद्धी दूरपर्यंत निर्माण झाली आणि आणि त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला.[] उपहारगृहातील पदार्थ बनवण्या बाबत त्यांना एक कल्पना सुचली. ज्यानुसार लडाख मधील पारंपरिक पद्धतीचे जेवण पपर्यटकांना दिल्यास उत्तम प्रतिसाद मिळेल असा त्यांचा आराखडा होता. त्या परिसरातील इतर उपहारगृहानी मात्र स्थानिक खाद्य परंपरेला हलक्यात घेतले.[] या मायलेकीच्या जोडीने मिळून स्थानिक पास्ता सारख्या उत्पादनाचा 'चुटगी' आणि वाफवलेले 'मोमो' नावाचे डंपलिंग्ज यांचा मेनू तयार केला. जर्दाळूच्या दाण्यांवर आणि त्यांच्या खास मिश्रणावर आधारित चहा बनवण्यास सुरुवात केली. हे व इतर पदार्थ आधुनिक आणि पारंपरिक पदार्थांच्या संगमाचा मेळ होता. याच सोबत विशेष म्हणजे जेवण करणारे ग्राहक लाकडाच्या ओव्हनभोवती बसून स्वयंपाकी त्यांचे जेवण बनवताना पाहू शकत होते. आणि त्यांची ही संकल्पना खूप प्रभावी ठरली.[]

वांगमो यांच्या उपहारगृहाला आणि तेथील पदार्थांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. २०१९ मध्ये त्यांनी इतर महिला व मुलींना सदरील पारंपरिक जेवण कसे शिजवायचे हे शिकवून आपल्या व्यवसायात अधिकची भर घातली. त्यांनी हे प्रशिक्षण केवळ मुली आणि महिलांनाच दिले, यामागील कारण म्हणजे त्या भागात पुरुष स्वयंपाकींची संकल्पना अस्तित्वात नाही.[]

२०१९ मध्ये वांगमो यांना या कामासाठी भारतातील महिलांसाठीच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. [] २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या पंधरा महिलांपैकी त्या एक होत्या.[][][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Nari Shakti awardees must contribute to eradicate malnutrition & save water: PM Modi". The Economic Times.
  2. "Leh'd on a rustic platter: Ladakhi cuisine gets a modern makeover". The Financial Express. 14 November 2021.
  3. "Promoting Ladakhi cuisine earns Nari Shakti Puraskar for Nilza Wangmo". The Asian Age. 8 March 2020.
  4. 1 2 3 Shali, Pooja (November 2, 2019). "Meet a woman chef who beat all odds to spread the taste of Ladakh". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-04-03 रोजी पाहिले.
  5. 1 2 3 4 "Lost Her Dad, Had to Leave College: Today, She Is Taking Ladakh's Food to the World". The Better India (इंग्रजी भाषेत). 2019-12-03. 2020-04-03 रोजी पाहिले.
  6. 1 2 "President of India Confers Nari Shakti Puraskar for 2019". ddnews.gov.in. 2019-03-08 रोजी पाहिले.
  7. "President gives Nari Shakti Puraskar". ddnews.gov.in. 2019-03-08 रोजी पाहिले.
  8. "Nilza Wangmo to get Nari Shakti Puraskar for promoting Ladakhi cuisines". Business Standard India. 2020-03-08. 2020-04-03 रोजी पाहिले.