निलू निरंजना गव्हाणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


निलू निरंजना गव्हाणकर
टोपणनाव: निलू
जन्म: ऑगस्ट २१, इ.स. १९४६
मुंबई
धर्म: हिंदू
प्रभाव: बाबा आमटे आणि साधनाताई आमटे

ओळख[संपादन]

निलू हि एक प्रथम भारतीय महिला आहे कि पूर्ण जगभर प्रवास केला आहे.वयाच्या ५० स व्या वर्षी जगाच्या प्रवासाला सुरुवात केली. इंजिनिअरींग कन्स्ट्रक्शन सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रातील करिअर एकटीने निभावल., आफ्रिकन कांगा डान्स शिकून तिनं खूप सारी बक्षिसे पटकावलेली. स्वतःच्या हिंमतीवर तिने जगप्रवास केला. सेसना विमान चालविण्याचा तिचा छंद,नोकरीतील हुद्दा, पैसा, ग्लॅमर यांच्या मोहाला बळी न पडता स्वीकारलेली स्वेच्छानिवृत्ती. मातृभूमीच्या प्रेमापोटी विविध संस्थाना दिलेल्या दोन कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या, भारतातील पहिली आणि एकमेव चित्रपट निर्मिती - जिचा निर्मितीमध्ये पूर्णपणे सहभाग आहे; जी त्याची कथालेखिका, दिग्दर्शिक आणि संगीत दिग्दर्शिका आहे - असा हा नानाविध क्षेत्रातील आव्हाने लीलया पेलणाच्या निलुच्या आयुष्याचा प्रवास सिंदबादच्या सफरींइतका विस्मयकारक आहे.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण[संपादन]

निलु हि मुळची मुंबईची आहे.त्यांच्या चार भावंडातील ती धाकटी आहे. तिचा जन्मदिवस २१ ऑगस्ट १९४६, गोकृळाष्ठमी (गोकुळाष्टमी) आहे . मुंबईच्या बी.पी.एम. शाळेतून मराठी माध्यमात शिक्षण घेऊन ती मॅट्रिक झाली. तिच्या वडिलांचा वेद, उपनिषद, विज्ञान, तत्त्वज्ञान, संगीत अशा विविध विषयांचा अभ्यास होता. आई भाषा विषयाची शिक्षिका असल्याने दोघांच्या सहवासात वाचनाची गोडी तिच्यात निर्माण झाली होती. नृत्याचीही तिला आवड होती. तिचा एक कार्यक्रम बघून राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये सहभागी होण्यासाठी तिला विचारलं गेलं. १९६१ च्या सुमारास कलापथका-बरोबर पन्नास-साठ ठिकाणी निलुने कार्यक्रम सादर केले. सवश्री वसंत बापट, लीलाधर हेगडे, स्नेहल भाटकर, हमीद दलवाई, दादा कोंडके, निळू फुले, राम नगरकर अशा थोर व्यक्तींचा सहवास तिला लाभला आणि त्याबरोबर माणुसकी हा एकच धर्म जपण्याची शिकवण तिच्या मनावर कोरली गेली. ती सोळा वर्षांची असतांना एकदा बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांना भेटायला रूग्णालयात गेली. त्या तिघांच्यात काय गप्पा झाल्या.तेव्हापासून ते निलू ला आपली मुलगी मानू लागले. १९६८ साली मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री हे विषय घेऊन ती बी.एससी. झाली. उच्च शिक्षणसाठी ती अमेरिकेला गेली.जाण्यापूर्वी कोयना भूकंपग्रस्तांसाठी चालू असलेल्या मदत कार्यात ती सहभागी झाली.

वैवाहिक जीवन[संपादन]

अमेरिकेला गेल्यावर वेगवेगळ्या अमेरिकन कुटुंबात ती पेईंग गेस्ट म्हणून राहिली. त्यामुळे अमेरिकन संस्कृतीशी तिची जवळून ओळख झाली. याच काळात तिचा एका देखण्या आणि हुषार पंजाबी गायकाशी परिचय झाला. तोही तिच्या युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग करत होता. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. तिच्या अमेरिकन कुटुंबात त्यांच्या जोरदार साखरपुडा झाला आणि काही वर्षांनंतर लग्न पण झाल. परंतु लग्नानंतर तिचे जीवन बदलले.तिचा नवरा जो कि तिचा प्रियकर होता.तो लग्नानंतर पूर्ण बदलला.माझा दिनक्रम याच्याशी तू जुळवून घेतलंच पाहिजेस,असा त्याचा अट्टाहास सुरू झाला.तिचा नवरा दर आठवड्याच्या पाट्य, उथळ गप्पा, गाणी गाणं आणि, बेसुमार पिणं हे आयुष्य स्वीकारणं निलुला अशक्य वाटू लागलं.त्यानंतर वकील वगैरेच्या भानगडीत न पडता वा एकमेकांवर दोषारोप न करता परस्पर संमतीनं घटस्फोट घ्यायचं ठरवलं. १ मे १९७४ रोजी त्यांना घटस्फोट मिळू शकणार होता; परंतु ११ जूनला त्याचा वाढदिवस एकत्र साजरा करून दुसरे दिवशी घर सोडून जाण्याचा निर्णय निलुने घेतला. त्याचं घर भाड्याचं होतं. घरातल्या वस्तूंमध्ये निलुला रस नव्हता. मूलबाळ नसल्यामुळे तो प्रश्न नव्हता. कोणीही प्रतारणा न केल्यामुळे मनात कडवटपणा नव्हता. निलुच्या हातात चांगली नोकरी, शिक्षण आणि आत्मविश्वास होता.

१९७६ साली पेन्सिल्वेनिया येथे अकराशे मेगावॉट पॉवर प्लान्टची उभारणी चालू होती. त्या कामावर आपल्याला पाठवावं अशी तिनं वरिष्ठांकडे विनंती केली; परंतु तेथील काम अत्यंत कष्टाचं होतं. शिवाय कन्स्ट्रक्शन साईटवर एकही स्त्री इंजिनिअर नव्हती; परंतु कामात कोणतीही कुचराई करणार नाही वा स्त्री म्हणून सवलत मागणार नाही, अशी हमी तिनं दिली. कामाच्या ठिकाणी शंभर शंभर फूट उंच शिड्या चढणं, क्रेनवर काम करणं, हार्ड हेल्मेट घालून उन्हातान्हात, थंडीवाच्यात फिरणं अशा कामात तिनं स्वतःला कमी पड़ दिलं नाही. या प्लान्टवर काम करताना तिनं जे ज्ञान आणि अनुभव मिळवला तो कोणत्याही शाळा, कॉलेजात जाऊन वा पुस्तकं वाचून मिळणं शक्य नव्हतं. १९७८ साली तिनं 'इंटरनॅशनल मॅनेजमेंट'मध्ये एम.बी.ए. पूर्ण केलं.

संदर्भ[संपादन]

  • पुस्तकाचे नाव-विश्वनागरीक्त्वाचे वेध
  • [१]