Jump to content

निरता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निरता ऊर्फ राघवाम्मा राघवन (जन्म - ४ जून १९३५, मृत्यू - १४ फेब्रुवारी २०२४), श्रीअरविंदश्रीमाताजी यांच्या एक अनुयायी. []

जीवन व कार्य

[संपादन]

वीर राघवन आणि शकुंतला यांच्या पोटी हैदराबाद संस्थानाच्या अखत्यारीतील एका खेडेगावात राघवाम्मा यांचा जन्म झाला. राघवाम्मा हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांना श्रीमाताजींनी निरता हे नाव दिले. त्याचा अर्थ सरळमार्गी असा होतो. निरता यांना रंगनाथ (जन्म १९३९) व श्रीनिवास (जन्म १९४३) असे दोन धाकटे भाऊ होते. निजाम शासनामध्ये रेव्हेन्यू विभागात निरता यांचे वडील नोकरी करत असत. श्रीअरविंद लिखित 'द मदर' हे पुस्तक वाचून ते प्रभावित झाले. ४ जून १९४५ रोजी म्हणजे निरता यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी, वीर आपल्या बायको-मुलांसह पाँडिचेरी येथे दर्शनास आले होते.[]

पुढे श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे निरता आपल्या धाकट्या भावासह (रंगनाथ याच्या सह) शिकू लागल्या. १९४६ मध्ये निरता यांची शारीरिक शिक्षण विभागातील एक कप्तान म्हणून निवड करण्यात आली. १९५५ मध्ये त्यांच्या आईच्या निधनानंतर निरता यांनी आपल्या दोन्ही धाकट्या भावंडाची जबाबदारी स्वीकारली.

४ जून १९५१ रोजी श्रीमाताजींनी राघवाम्मा यांना 'निरता' हे नाम दिले. ईश्वराप्रति निष्ठावान आसक्ती, प्रामाणिक भक्ती आणि सरळपणा असा निरता या शब्दाचा अर्थ आहे.

बॉक्सर म्हणून विख्यात असणाऱ्या प्रणव कुमार भट्टाचार्य यांच्याकडून निरता यांनी बॉक्सिंगचे धडे गिरवले. त्या कुस्तीमध्येही प्रवीण होत्या. भरतकाम आणि पेंटिंग यामध्ये देखील निरता यांना गती होती.

१९५८ साली त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरता या श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे इंग्रजीच्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या वयाच्या ८० वर्षापर्यंत त्या अध्यापनाचे काम करत होत्या.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Nirata: The Embodiment of 'Sincere Devotion' by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2025-03-16. 2025-03-28 रोजी पाहिले.