निपाह विषाणू
disease caused by Nipah virus | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | रोग, Monarch Disease Ontology release 2018-06-29sonu | ||
---|---|---|---|
उपवर्ग | Henipavirus infectious disease, viral encephalitis, zoonosis | ||
| |||
![]() |
निपाह विषाणू हा आरएनए "विषाणू" आहे. हा विषाणू पॅरामॉक्सोवाइरीडे कुटुंबाचा एक भाग आहे. हा प्रथमतः १९९८ आणि १९९९ मध्ये मलेशियन व सिंगापूर मधील डुकरांना आणि एन्सेफेलिटिक रोगांमध्ये गंभीर श्वसन रोगाला बळी पडलेल्या मनुष्यांनंतर प्रथम झोनोटिक रोगकारक म्हणून ओळखला गेला. झोनोटिक हा रोगप्रकार प्राणी व मनुष्य या दोघांमध्येही आढळून येतो. झोनोटिक हा शब्द झोनोसिस या शब्दाशी संबंधित आहे. झोनोसिस म्हणजे माणसांना प्राण्यांपासून होणारे रोग. हा रोग मुळतः प्राण्यांमध्ये असून ज्याची लागण माणसांना देखील होऊ शकते. निपाह विषाणू फळांच्या वटवाघुळात मुख्यत्वे आढळतो. 'फळांचे वटवाघुळ' म्हणजेच असे वटवाघुळ जे फळे खातात. त्यांनाच फळांचे वटवाघुळ असे म्हणतात. ही वटवाघुळे पेट्रोपॉडीडी परिवारात समाविष्ट आहेत. निपाह विषाणू हा हेंद्राच्या विषाणूशी संबंधित आहे व हे दोन्ही विषाणू हेनिपाव्हायरसचे सदस्य म्हणून ओळखले जातात. हेनिपाव्हायरस हा पॅरामॉक्सोवाइरीडे चा नवीन प्रकार मानला जातो. निपाह विषाणू हा वटवाघुळाची विष्ठा, लघवी व लाळ इ. आढळून येतो. हा विषाणू मनुष्य ते मनुष्य देखील पसरू शकतो. लोक किंवा प्राणी यांच्यासाठी कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मानवाचे प्राथमिक उपचार हे काळजी घेणे हे आहेत.
उद्भव[संपादन]
निपाह विषाणू हा वटवाघुळात उपस्थित असतो. वटवाघुळ हे निपाह विषाणूचे राहण्याचे ठिकाण असे थोडक्यात म्हणले जाते. १९९८ मध्ये मलेशियात जेव्हा जंगलतोड झाली, तेव्हा जंगलातील वटवाघुळे मनुष्य व इतर पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येऊ लागली, विषेशतः डुक्कर. निपाह विषाणू हा वटवाघुळामधुन सर्वात आधी आजारी डुकरामध्ये पसरला व तेथून मनुष्याला लागण होऊन १९९८ ते १९९९ दरम्यान मलेशियात २६५ जणांचे बळी गेले. त्यानंतर हा विषाणू २००४ मध्ये बांग्लादेश मध्ये फळाच्या वटवाघुळाद्वारे पसरला व २०१८ मध्ये भारतातील केरळ राज्यात. केरळ राज्यातील काहींचा मृत्यू देखील झाला आहे. अल्ट=Nipah-virus-infection|इवलेसे|Nipah-virus-infection
आकृती[संपादन]
निपाह विषाणूमुळे होणारा संसर्ग .
संदर्भ[संपादन]
http://www.who.int/csr/disease/nipah/en/
www.google.co.in