नितीन बानुगडे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


नितीन बानुगडे-पाटील- (१० मे- हयात) हे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित. जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक[ संदर्भ हवा ] गौरव.

नितीन बानुगडे-पाटील
जन्म नितीन संपतराव बानुगडे-पाटील
१० मे १९७७
शिक्षण एम.एस.सी.भौतिकशास्त्र(पुणे विद्यापीठ), बी.एड.(सातारा), बी.जे.(कराड)
पेशा इतिहास अभ्यासक, लेखक,प्रेरणादायी वक्ते
प्रसिद्ध कामे आपल्या तेजस्वी वानीतुन महारष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज,यशवंतराव चव्हाण,जगणं समाजासाठी अशा अनेक विषयांवर प्रबोधन व तरुण पिढीला मार्गदर्शन.
मूळ गाव रहिमतपूर,सातारा
ख्याती सुप्रसिद्ध व्याख्याते
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म
जोडीदार अंजली नितीन बानुगडे-पाटील
अपत्ये शंभू
वडील संपतराव बानुगडे-पाटील


गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची ही वर्तमानातील व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली. २०१४ मध्ये शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेकडून त्यांची सातारा-सांगली संपर्क प्रमुख पदी नियुक्ती.२६ जानेवारी २०१६ मध्ये शिवसेना उपनेते पदी नियुक्ती आणि ०१ सप्टेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र शासन कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी नियुक्ती करण्यात आली.

बानुगडे पाटील यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • रौद्र (संभाजीमहाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
  • शंभूराजे (महानाट्य)
  • काही जनातल काही मनातलं
  • यशाचा Password