Jump to content

नितीन नबीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नितीन नबीन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावनितीन संपादन
आडनावSinha संपादन
जन्म तारीख२३ मे 1980 संपादन
जन्मस्थानरांची संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदबिहार विधानसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय जनता पक्ष संपादन

नितीन नबीन (पूर्ण नाव: नितीन नबीन सिन्हा) (जन्म: २३ मे, १९८०) हे एक भारतीय राजकारणी, राजकीय संघटक आणि कार्यकर्ते आहेत. सिन्हा हे जानेवारी २०२६ पासून भारतीय जनता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.[१] तत्पूर्वी त्यांनी डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.[२][३] ४५ व्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष झालेले सिन्हा हे भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.

सिन्हा यांनी बिहारच्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले होते. त्यावेळी ते २०२४ ते २०२५ पर्यंत रस्ते बांधकाम मंत्री होते. सध्या ते बिहार विधानसभेत बनकीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण

[संपादन]

नितीन नबीन सिन्हा यांचा जन्म २३ मे १९८० रोजी झारखंड मधील रांची येथे चित्रगुप्तवंशी कायस्थ जातीत झाला. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत. २००६ मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सक्रिय निवडणूक राजकारणात प्रवेश केला.[४]

त्यांनी १९९८ मध्ये दिल्लीतील सीएसकेएम पब्लिक स्कूलमधून आपले इंटरमीडिएट शिक्षण पूर्ण केले.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

२००६ मध्ये पाटणा पश्चिम येथून झालेल्या पोटनिवडणुकीत नबीन यांनी त्यांची पहिली निवडणूक जिंकली आणि बिहार विधानसभेचे सदस्य झाले.[५]

मतदारसंघाच्या सीमांकनानंतर, त्यांनी नवीन बंकीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी ९८,२९९ मते मिळवली आणि राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमारी यांचा ५१,९३६ मतांनी पराभव केला.[६]

सिन्हा यांनी बिहार सरकारमध्ये विविध मंत्रीपदे भूषवली आहेत. त्यांनी फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत रस्ते बांधकाम मंत्री म्हणून काम केले. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांना त्याच खात्यात पुन्हा नियुक्त करण्यात आले. डिसेंबर २०२५ पर्यंत ते या पदावर होते. मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान त्यांनी शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री आणि कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम पाहिले.

पक्ष संघटनेतील भूमिका

[संपादन]

सिन्हा यांनी भाजपमध्ये अनेक संघटनात्मक पदांवर काम केले आहे. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि BJYM बिहारचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले आहे.[७] BJYM मधे असताना, त्यांनी युवा एकत्रीकरण मोहिमांमध्ये भाग घेतला, त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील राष्ट्रीय एकता यात्रा आणि १९६५ च्या युद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ गुवाहाटी ते तवांग पर्यंत श्रद्धांजली मिरवणूक इत्यादींत त्यांचा होता. त्यांनी सिक्कीमसाठी भाजप प्रभारी आणि छत्तीसगडसाठी सह-प्रभारी म्हणून देखील काम केले आहे, त्या राज्यांमध्ये संघटनात्मक उपक्रम आणि निवडणूक मोहिमांमध्ये योगदान दिले आहे.[२]

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष

[संपादन]

डिसेंबर २०२५ मध्ये, भाजप संसदीय मंडळाने सिन्हा यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. जानेवारी २०२६ पासून ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांच्या जागी कार्यरत आहेत.[८][२]

राजकीय कालक्रम

[संपादन]
  • २००६ - पाटणा पश्चिम येथून पोटनिवडणूक जिंकली आणि आमदार झाले.
  • २०१० - बनकीपूर येथून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
  • २०१५ - बनकीपूर येथून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
  • २०२० - सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवड.
  • २०२१-२०२२ – रस्ते बांधकाम मंत्री, बिहार
  • २०२४-२०२५ – नगरविकास आणि गृहनिर्माण आणि कायदा आणि न्याय मंत्री
  • २०२५ - बनकीपूर येथून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
  • डिसेंबर २०२५ – भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती.[९][१०]
  • जानेवारी २०२६ – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Nitin Nabin elected national BJP president unopposed: To take charge January 20; PM Modi to attend event". Times of India. 19 January 2026 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 "Who is Nitin Nabin, the Bihar MLA appointed as BJP National Working President?". India Today. 14 December 2025. 14 December 2025 रोजी पाहिले.
  3. ↑ "BJP gets new chief: Bihar minister Nitin Nabin appointed national working president; to replace JP Nadda". The Times of India. 14 December 2025. 14 December 2025 रोजी पाहिले.
  4. ↑ "Nitin Nabin elected national BJP president unopposed: To take charge January 20; PM Modi to attend event". Times of India. 19 January 2026 रोजी पाहिले.
  5. ↑ "Nitin Nabin elected national BJP president unopposed: To take charge January 20; PM Modi to attend event". Times of India. 19 January 2026 रोजी पाहिले.
  6. ↑ "Nitin Nabin elected national BJP president unopposed: To take charge January 20; PM Modi to attend event". Times of India. 19 January 2026 रोजी पाहिले.
  7. ↑ "Nitin Nabin elected national BJP president unopposed: To take charge January 20; PM Modi to attend event". Times of India. 19 January 2026 रोजी पाहिले.
  8. ↑ "Nitin Nabin elected national BJP president unopposed: To take charge January 20; PM Modi to attend event". Times of India. 19 January 2026 रोजी पाहिले.
  9. ↑ "BJP gets new chief: Bihar minister Nitin Nabin appointed national working president; to replace JP Nadda". The Times of India. 14 December 2025. 16 December 2025 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2025 रोजी पाहिले.
  10. ↑ "Nitin Nabin takes charge as BJP working president" (इंग्रजी भाषेत). The Hindu. 15 December 2025. 16 December 2025 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2025 रोजी पाहिले.