निखिता गांधी
Indian playback singer who has worked in Indian films in four different languages. | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | ऑक्टोबर २, इ.स. १९९१ कोलकाता | ||||
|---|---|---|---|---|---|
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय | |||||
| |||||
निखिता गांधी (जन्म: १ ऑक्टोबर १९९१) ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे जिने पाच वेगवेगळ्या भाषांमधील भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तमिळ, हिंदी, तेलुगू, बंगाली आणि कन्नड चित्रपट प्रकल्पांमध्ये काम केले आहे.[१]
तिने दीपिका पडुकोण साठी राब्ता चित्रपटाचे शीर्षकगीता गायले.[२] जग्गा जासूस या चित्रपटातील अरिजित सिंगसोबत तिचे "उल्लू का पट्ठा" हे युगल गाणे हिट झाले आहे.[३] तिने सचिन: अ बिलियन ड्रीम्स, जब हॅरी मेट सेजल, केदारनाथ, लुका चुप्पी, सूर्यवंशी आणि टायगर ३ यासह अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तिने लिओ, वारिसु, कॉकपिट आणि किश्मिश सारख्या चित्रपटांमधील बंगाली आणि तमिळ गाणी देखील गायली आहेत. तिची "आओ कभी हवेली पे" आणि "पोस्टर लगवा दो" ही गाणीही लोकप्रिय झाली. बादशाहसोबतचे "जुगनू" हे गाणे खूपच व्हायरल झाले.
जीवन व कारकीर्द
[संपादन]निखिताचा जन्म कोलकाता येथे झाला होता आणि पदवीचे शिक्षण घेत असताना ती चेन्नईमध्ये राहत होती. लहानपणी तिने जवळजवळ १२ वर्षे ओडिसी नृत्य आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले आहे.[४]
कोलकाता येथील मिश्र बंगाली आणि पंजाबी कुटुंबात तिचा जन्म झाला. निखिताने तिचे शालेय शिक्षण कोलकात्यातील प्रतिष्ठित ला मार्टिनियर फॉर गर्ल्समधून केले आहे. २०१० मध्ये ती दंतचिकित्सा विषयात पदवी मिळविण्यासाठी चेन्नईला स्थलांतरित झाली.[५] ए.आर. रहमानच्या के.एम. कॉलेज ऑफ म्युझिक अँड टेक्नॉलॉजीची माजी विद्यार्थिनी असलेल्या निखिताचा रहमानशी पहिला संबंध इंडो-जर्मन देवाणघेवाणीदरम्यान आला, जिथे ती जर्मन ऑर्केस्ट्रासोबत सादरीकरण करणाऱ्या एका गायनगटाचा भाग होती. त्यानंतर रहमानने शेखर कपूर यांच्यासोबत "क्युकी" नावाच्या एका व्यावसायिक प्रकल्पासाठी तिचे वैयक्तिक ऑडिशन घेतले, ज्यावर ते दोघेही काम करत होते.[१] २०१२ मध्ये, तिने प्रसिद्ध कवी काझी नजरुल इस्लाम यांनी लिहिलेल्या नजरुल गीतीची पुनर्रचना, कोथा नावाचा बंगाली अल्बम मध्ये मांडली.[६]
तिच्या वैयक्तिक स्टुडिओ अल्बमवर काम केल्यानंतर आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये गाण्यांचा भाग म्हणून गायल्यानंतर, निकिताने एस. शंकरच्या आय (२०१५) चित्रपटातील "लाडिओ" हे गाणे सादर करून एक वेगळीच ओळख निर्माण केली. ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे हिंदीत अनुवादित केल्यानंतर तिने चार तासांत रेकॉर्ड केले. त्यानंतर तिने गाण्याच्या तेलुगू आणि हिंदी आवृत्त्या देखील रेकॉर्ड केल्या, ज्यामुळे तिच्या कामासाठी समीक्षकांची प्रशंसा झाली.[१] २०१५ मध्ये तिने काम. केलेल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये रहमानचा ओ कादल कानमानी आणि अनिरुद्धचा थांगा मगन यांचा समावेश आहे.
चित्रपटांमध्ये गाण्याव्यतिरिक्त, तिने एक बँड तयार केला आहे आणि केरळ आणि कोलकाता येथेही सादरीकरण केले आहे. गांधींच्या पाच सदस्यांच्या बँडमध्ये साजिथ सत्य, जेरार्ड फेलिक्स, गॉडफ्रे इमॅन्युएल आणि जोशुआ गोपाळ यांचा समावेश आहे.[४]
राब्ता या गाण्याच्या शीर्षकगीतासाठी तिला झी सिने पुरस्कार २०१८ द्वारे वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून निवडण्यात आले होते.[७]
जब हॅरी मेट सेजल मधील "घर" या गाण्यासाठी तिला ६३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) श्रेणीसाठी नामांकन मिळाले.[८]
मेघनाद बध रहस्य मधील "तोमरा एखोनो की" या बंगाली गाण्यासाठी तिला तिसऱ्या फिल्मफेर ईस्ट अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) म्हणून नामांकन मिळाले होते.[९]
नोव्हेंबर २०१८ मध्ये तिने केदारनाथ चित्रपटातील "काफिराना" गाण्यासाठी पार्श्वगायन केले आणि ते हिट झाले.[१०] एप्रिल २०१९ मध्ये, तिने अरिजीत सिंगसोबत केदारनाथमधील "काफिराना" या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट युगलगीतासाठी नेस्ले किटकॅट सोनी मिक्स ऑडियन्स म्युझिक अवॉर्ड जिंकला.[११]
एप्रिल २०१९ मध्ये, तिने झी म्युझिक कंपनीवर तिचे एकल "एक दो तीन" रिलीज केले जे रईस आणि झैन - सॅम यांनी संगीतबद्ध केले होते. नंतर तिने जून २०१९ मध्ये विशाल दादलानीसोबत द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर चित्रपटातील "मदारी" आणि त्यानंतर अर्जुन पटियाला मधील "मैं दीवाना तेरा" हे गाणे सादर केले होते.[१२][१३]
२०२४ मध्ये, निखिताने झलक दिखला जा मध्ये वाइल्ड कार्ड प्रवेशिका म्हणून भाग घेतला पण तिची निवड झाली नाही.[१४]
पुरस्कार
[संपादन]| पुरस्कार | श्रेणी | काम | निकाल | संदर्भ |
|---|---|---|---|---|
| १० वे मिर्ची संगीत पुरस्कार | वर्षातील महिला गायिका | जब हॅरी मेट सेजल - "घर" | नामांकन | [१५] |
| फिल्मफेर पुरस्कार | सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) | नामांकन | [१६] | |
| सोनी मिक्स ऑडियन्स म्युझिक अवॉर्ड्स | सर्वोत्कृष्ट युगलगीत | केदारनाथ - "काफिराना" | विजयी | |
| झी सिने पुरस्कार | सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक | राब्ता - "राब्ता" | विजयी |
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 "Nikhita Gandhi: AR Rahman never lets his singers get nervous". The Times of India. 2015-12-30 रोजी पाहिले.
- ↑ "I don't think I could have asked for something better: Nikhita Gandhi on 'Raabta'". 2017-09-26 रोजी पाहिले.
- ↑ "From KM to Jagga Jasoos, tracing Nikhita Gandhi's musical journey". The New Indian Express. 2017-09-26 रोजी पाहिले.
- 1 2 Ramanujam, Srinivasa (2015-06-18). "Ladio girl and her band". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2017-09-26 रोजी पाहिले.
- ↑ "I did not know that I was singing the final version of Raabta". The Times of India. 2017-09-26 रोजी पाहिले.
- ↑ "Taking the next step". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2015-06-05. ISSN 0971-751X. 2015-12-30 रोजी पाहिले.
- ↑ "Zee Cine Awards 2018 complete winners list: Secret Superstar, Golmaal Again and Toilet Ek Prem Katha win big". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2017-12-20. 2018-06-18 रोजी पाहिले.
- ↑ "63rd Jio Filmfare Awards 2018: Official list of nominations". The Times of India. 23 January 2018. 8 June 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Filmfare Awards East 2018 Nominations - Filmfare.com". filmfare.com.
- ↑ ANI (2018-11-20). "'Qaafirana' highlights soulful love between Sara, Sushant". Business Standard India. 2019-07-09 रोजी पाहिले.
- ↑ "Best Duet". facebook.com (इंग्रजी भाषेत). 2019-07-09 रोजी पाहिले.
- ↑ "Dhanush sets the dance floor on fire in the song Madaari from The Extraordinary Journey of the Fakir". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 2023-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-09 रोजी पाहिले.
- ↑ Guru Randhawa: Main Deewana Tera |Arjun Patiala | Diljit D, Kriti S |Sachin -Jigar | Nikhita Gandhi
|access-date=requires|url=(सहाय्य) - ↑ "Jhalak Dikhhla Jaa 11: Nikhita Gandhi gets eliminated; wildcard contestants Manisha Rani, Dhanashree Verma and others enter the show". द टाइम्स ऑफ इंडिया. 15 January 2024.
- ↑ "Nominations - Mirchi Music Awards 2017". MMAMirchiMusicAwards. 2018-03-13 रोजी पाहिले.
- ↑ "Filmfare Awards 2018 Nominations - 63rd Filmfare Awards 2018". filmfare.com.