Jump to content

निकोलास मदुरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nicolás Maduro

निकोलस मादुरो मोरोस हे व्हेनेझुएलाचे राजकारणी आहेत. व्हेनेझुएलाचे नेते हुगो चावेझ यांचे हे राजकीय वारसदार मानले जातात. हुगो चावेझ यांच्या सरकारमध्ये ते उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री होते.

बसचालक असलेले मदुरो कामगार संघटनांचे अध्यक्ष झाले आणि पुढे २००० मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून निवडून आले. चावेझ सरकारमध्ये अनेक पदांवर काम केल्या नंतर २००६ मध्ये ते व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री झाले. मादुरो हे चावेझ यांच्या आतल्या गोटातील अत्यंत खास आणि धोरणी नेते म्हणून ओळखले जात.

चावेझ यांच्या निधनानंतर मार्च २०१३ मध्ये ते काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर झालेल्या फेरनिवडणुकांमध्ये १४ एप्रिल २०१३ रोजी निर्वाचन आयोगाने त्यांना विजयी घोषित केले. एप्रिल २०१३ मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये अगदी थोड्या मताधिक्याने युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार हेनरिक काप्रिलेस यांचा पराभव करून जिंकून आले. काप्रिलेस हे मिरांडा राज्याचे राज्यपाल आहेत. मादुरो यांच्या फेरनिवडणुकीवर आणि मतमोजणी प्रक्रियेवर काप्रिलेस यांनी जोरदार आक्षेप केले होतेत. मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेत अनेक उणिवांकडे लक्ष वेधत त्यांनी चौकशीची मागणी केली होती परंतु यांकडे दुर्लक्ष केले गेले.

३ जानेवारी, २०२६ रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकास आणि इतर ठिकाणी हल्ले चढवले व त्या दरम्यान मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना उचलून न्यू यॉर्कला नेले.