Jump to content

निकोलस विंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर निकोलस जॉर्ज विंटन (१९ मे, १९०९ - १ जुलै, २०१५) एक ब्रिटिश समाज सेवक, शेरदलाल आणि रेड क्रॉसचे अधिकारी होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाआधी नाझी जर्मनी आणि जर्मनीच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या ज्यूंच्या शिरकाणातून शेकडो ज्यू मुलांची सुटका करण्यात मदत केली.चेकोस्लोव्हाकियामधील ही ६६९ मुले बव्हंशी ज्यू होती.

महायुद्ध सुरू होण्याआधी विंटन चेकोस्लोव्हाकियामध्ये गेले होते तेव्हा त्यांनी तेथील ज्यू मुले मृत्युमुखी पाठविण्यात असलेली पाहिली व त्यांपैकी ज्यांना वाचवता येईल अशांची यादी त्यांनी तयार करण्यास मदत केली. ब्रिटनला परतल्यावर विंटन यांनी या मुलांना तेथे आणण्यासाठीची कायदेशीर व्यवस्था तसेच त्यांना राहण्यासाठी घरे आणि दत्तक पालकांचा शोध घेतला. ही मुले ब्रिटनमध्ये आल्यावर विंटन यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था लावून दिली.[]

विंटननी केलेले हे काम बव्हंशी पडद्याआडच राहिले. १९८८मध्ये बीबीसीने दॅट्स लाइफ या कार्यक्रमातून विंटन आणि त्यांनी सोडविलेल्या मुलांपैकी १२-१४ मुलांशी अनपेक्षित गाठ घालून दिली. ही गाठ देशभर प्रसिद्ध झाली आणि ब्रिटिश नियतकालिकांनी विंटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले काम उचलून धरले. त्यांना ब्रिटिश शिंडलर असे टोपणनाव मिळाले.[] २००३मध्ये राणी एलिझाबेथने त्यांना या कामासाठी नाइटहूड दिले.[] २८ ऑक्टोबर २०१४ रोजी चेक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष मिलोस झेमन यांना ऑर्डर ऑफ व्हाइट लायन हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला.

१ जुलै, २००६ रोजी वयाच्या १०६व्या वर्षी विंटन यांचे निधन झाले. []

प्रागमधून ब्रिटनला निघालेली चेक मुले. चष्मा घातलेले विंटन व्हिडियोच्या शेवटी दिसतील.

विंटन यांनी वाचविलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]
  • लेस्ली बारुच ब्रेंट (1925-2019), इम्युनोलॉजिस्ट
  • अल्फ डब्स, बॅरन डब्स (जन्म 1932), ब्रिटिश मजूर पक्षाचे राजकारणी आणि माजी संसद सदस्य []
  • हेनी हल्बरस्टम (1926-2014), गणितज्ञ []
  • रेनाटा लॅक्सोवा (1931-2020), बालरोग अनुवंशशास्त्रज्ञ []
  • इसी मेत्झेस्टाइन (1928-2012), आधुनिकतावादी वास्तुविशारद []
  • गेर्डा मेयर (1927-2021), कवी []
  • कारेल रेझ (1926-2002), चित्रपट निर्माता [१०]
  • जो श्लेसिंगर (1928-2019), कॅनेडियन दूरचित्रवाणी पत्रकार आणि लेखक [११]
  • यित्झचोक टुव्हिया वेइस (१९२६-२०२२), जेरुसलेममधील एडाह हाचेरेडिसचे मुख्य रब्बी [१२]
  • वेरा गिसिंग (1928 – 2022), लेखक आणि अनुवादक [१३]


ऑक्टोबर २००७ मध्ये प्रागमध्ये विंटन



संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Sir Nicholas Winton, A Man of Courage". Auschwitz. 2008. 12 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 September 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "Statue for 'British Schindler' Sir Nicholas Winton". BBC News. 18 September 2010. 18 September 2010 रोजी पाहिले.
  3. ^ You must specify issue= when using {{London Gazette}}.
  4. ^ "Holocaust 'hero' Sir Nicholas Winton dies aged 106". BBC News (इंग्रजी भाषेत). 2015-07-01. 2022-07-31 रोजी पाहिले.
  5. ^ "Nicholas Winton's children: The Czech Jews rescued by 'British Schindler'". BBC News. 1 July 2015. 1 July 2015 रोजी पाहिले.
  6. ^ Champaign Resident Remembers the Kindertransport
  7. ^ dmoe@madison.com, 608-252-6446, DOUG MOE. "Doug Moe: Escaping the Nazis, with a hero's help". madison.com (इंग्रजी भाषेत). 21 April 2020 रोजी पाहिले.
  8. ^ "Isi Metzstein obituary". The Guardian. 22 June 2012. 8 June 2020 रोजी पाहिले.
  9. ^ Emanuel, Muriel; Gissing, Věra (2002), Nicholas Winton y la generación rescatada, p. 102.
  10. ^ Emanuel, Muriel; Gissing, Věra (2002), Nicholas Winton y la generación rescatada, p. 110.
  11. ^ Emanuel, Muriel; Gissing, Věra (2002), Nicholas Winton y la generación rescatada, p. 138
  12. ^ Sokol, Sam; staff, T. O. I. "Head of hardline Eda Haredit, initially resistant on virus rules, is infected". www.timesofisrael.com (इंग्रजी भाषेत). 21 April 2020 रोजी पाहिले.
  13. ^ "Vera Gissing, one of Winton's children, has died aged 93". 16 March 2022.

बाह्य दुवे

[संपादन]