Jump to content

निकाह (१९८२ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकाह (१९८२ चित्रपट)
चलचित्र
गट-प्रकारनाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1982 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकबलदेव राज चोप्रा संपादन
प्रमुख कलाकारराज बब्बर, दीपक पराशर, सलमा आगा, Iftekhar संपादन
संगीतकाररविशंकर शर्मा संपादन
निर्माताबलदेव राज चोप्रा संपादन
Narrative locationहैदराबाद संपादन
रंगcolor संपादन

निकाह हा १९८२ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे जो बी.आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित आहे.

या चित्रपटात राज बब्बर, दीपक पराशर आणि सलमा आगा यांनी भूमिका केल्या आहे. आगाचा हा बॉलीवूड चित्रपटातील पदार्पणाचा चित्रपत आहे. या चित्रपटात असरानी आणि इफ्तेखार यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचे संगीत रवी यांनी दिले होते आणि ते खूप गाजले. चित्रपटाचे मूळ नाव तलाक तलाक तलाक होते, परंतु इस्लामी धर्मगुरूंच्या आग्रहावरून त्याचे नाव निकाह असे ठेवण्यात आले.[]

या चित्रपटाला १९८२ मध्ये सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला.[] १९८२ मधील हा सहावा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट होता.[]

चित्रपटाचा मोठा भाग हैदराबादमधील अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे - उस्मानिया विद्यापीठ, नेकलेस रोड (हुसेन सागर), चारमिनारजवळील सरकारी निजामिया तिब्बी कॉलेज, सार्वजनिक उद्यानातील शाही मशीद आणि रवींद्र भारती सभागृह.[][]

संगीत

[संपादन]

सर्व गीतांचे गीतकार आहे हसन कमाल (फक्त "चूपके चूपके रात दिन" हे हसरत मोहानी यांनी लिहीले आहे., सर्व गीतांचे संगीतकार आहे रवी[].

गीत
क्र. शीर्षकगायक अवधी
१. "बीते हुए लम्हों की कसक"  महेंद्र कपूर 5:57
२. "चेहरा छुपा लिय है"  महेंद्र कपूर, सलमा आगा, आशा भोसले 6:32
३. "चूपके चूपके रात दीन"  गुलाम अली 7:48
४. "दिले के अरमान"  सलमा आगा 4:23
५. "दिल की ये आरजू थी"  महेंद्र कपूर, सलमा आगा 5:42
६. "फिजा भी है जवान जवान" (१)सलमा आगा 4:02
७. "फिजा भी है जवान जवान" (२)सलमा आगा 5:07
एकूण अवधी:
39:31

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
फिल्मफेर पुरस्कार
विजेताश्रेणीनिकाल
सलमा आगा ("दिल के अरमान")फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारजिंकला[][]
अचला नगरफिल्मफेर सर्वोत्तम संवाद पुरस्कार
बलदेव राज चोप्राफिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कारनामांकन
फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
सलमा आगाफिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
अचला नगरफिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार
रविफिल्मफेर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
हसन कमाल ("दिल के अरमान")फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार
हसन कमाल ("दिल की ये आरजू थी")
सलमा आगा ("फिजा भी है जवान जवान")फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार
सलमा आगा ("दिल की ये आरजू थी")

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "From 'Talaq, Talaq, Talaq' to 'Nikaah': a film that had its name changed (film review of Nikaah)". Deccan Herald newspaper. 24 August 2017. 4 December 2023 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Awards in 1982". MySwar.in website. 30 June 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2023 रोजी पाहिले.
  3. "Top Earners of 1982 (Nikaah is #6 on the list)". BoxOfficeIndia website. 1 February 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2023 रोजी पाहिले.
  4. 1 2 Bhagyalakshmi Seshachalam (21 June 2019). "Nikaah (1982) Depicts An Indian Muslim Woman's Predicament (film review of Nikaah)". MONEYLIFE.in website. 4 December 2023 रोजी पाहिले.
  5. "Nikaah (1982 film)". Upperstall.com website. 10 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2023 रोजी पाहिले.