Jump to content

नाविका सागर परिक्रमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाविका सागर परिक्रमा कर्मचाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

नाविका सागर परिक्रमा ही एक भारतीय नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी केलेली जगाची प्रदक्षिणा आहे. या सहा महिला सदस्यांच्या पथकाने आयएनएसव्ही तारिणीवरून त्यांच्या पहिल्या जागतिक प्रवासात संपूर्ण परिक्रमेचे स्वतःच व्यवस्थापन केले. हा प्रवास १० सप्टेंबर २०१७ ते २१ मे २०१८ पर्यंत असा एकूण २५४ दिवस चालला. हा प्रवास फक्त फ्रीमँटल, लिट्टेल्टन, पोर्ट स्टॅन्ली आणि केप टाउन या ४ बंदरांसह पोर्ट लुइस येथे सक्तीने तांत्रिक थांबा देऊन पूर्ण केला गेला. तसेच ही परिक्रमा विषुववृत्त दोनदा ओलांडून आणि ३ महासागरांमधून फिरून पूर्ण पार पडली.[][] हा प्रवास मूळतः ५ सप्टेंबर २०१७ रोजी सुरू होणार होता, परंतु नुकत्याच संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त झालेल्या निर्मला सीतारमण यांच्याहहस्ते या पथकाला हिरवा झेंडा दाखवता यावा म्हणून ५ दिवसांचा विलंब झाला.[] २१,६०० नॉटिकल मैल (४०,००० किमी) प्रवास केल्यानंतर ही बोट गोव्यातील आयएनएस मांडवीत परतली.[] हा प्रवास नॅशनल जिओग्राफिक आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे निर्मित केलेल्या तारिणी या माहितीपटात दाखवण्यात आला होता. याचे प्रथम प्रसारण ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त लेडी श्री राम कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात केल्या गेले.[] या प्रवासापासून प्रेरणा घेत नॅशनल जिओग्राफिक ने "गर्ल्स हू सेल" नावाची नवीन केवळ महिलांची माहिती असलेली मालिका सुरू केली.[]

महत्त्व

[संपादन]

महिला सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत, त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करणे, जागतिक व्यासपीठावर भारताची नारी शक्ती प्रदर्शित करणे आणि आव्हानात्मक वातावरणात महिलांच्या सहभागाची दृश्यमानता वाढवून त्यांच्याबद्दलच्या दृष्टिकोनात आणि मानसिकतेत क्रांती घडवून आणण्यास मदत करणे, असा नाविका सागर परिक्रमा यात्रेचा हेतू होता. या प्रवासाचा उद्देश भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही तारिणीवर बसून सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे प्रदर्शन करणे देखील होते. सदरील जहाज वाऱ्याचा वापर करत असल्याने पर्यावरणपूरक अपारंपारिक अक्षय ऊर्जेच्या वापराला देखील प्रोत्साहन दिले गेले. हे कर्मचारी सागरी प्रदूषण पातळीचे निरीक्षण करून एक अहवाल देतील असा देखील एक हेतू होता.[] त्याशिवाय, या पथकाने भारतीय वंशाच्या स्थानिक लोकांशी संवाद साधणे तसेच हवामानशास्त्र /महासागर लाटांचा डेटा दररोज एकत्रित करणे आणि अपडेट करणे अपेक्षित आहे जेणेकरून हवामानाचा चांगला अंदाज घेता येईल आणि संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवामान विभाग त्याचे विश्लेषण करू शकेल. या प्रवासामागील खरी प्रेरणा व्हाइस अ‍ॅडमिरल आवटी (परम विशिष्ट सेवा पदक, वीर चक्र) यांची होती ज्यांना भारतीय निर्मित नौकेतून सर्व महिलांच्या पथकाने जगाची प्रदक्षिणा पाहायची होती.[][] या प्रवासाच्या लोगोचे २०१७ च्या सुरुवातीला अनावरण करण्यात आले होते.[१०]

प्रशिक्षण

[संपादन]

२०१४ मध्ये सेवेत असलेल्या ५०० महिला नौदल अधिकाऱ्यांपैकी ४० अर्जदारांमधून पथकाची निवड करण्यात आली. तथापि, भीतीपोटी कुटुंबियांनी परवानगी नाकारल्याने अनेक उमेदवारांनी या परीक्षेतून माघार घेतली. वेगवेगळ्या केडरमधून निवडलेल्या या महिलांना नेव्हिगेशन, दळणवळण, दुरुस्ती आणि देखभाल या पैलूंमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. [११] प्रदक्षिणा घालण्यापूर्वी, क्रूने जवळजवळ तीन वर्षे प्रशिक्षण घेतले ज्यामध्ये मुंबई आणि केरळमधील विविध भारतीय नौदल शाळांमध्ये सैद्धांतिक प्रशिक्षणाचा समावेश होता.[१२] त्यानंतर INSV म्हादेई आणि INSV तारिणी बद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले गेले. २०१६ पर्यंत भारताचे पहिले एकल परिभ्रमण करणारे कॅप्टन दिलीप दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने प्रशिक्षण घेतले. या पथकाने २०१६ आणि २०१७ मध्ये गोवा ते पोरबंदर, मुंबई, कारवार, मॉरिशस अशा विविध नौकानयन सफर केल्या आणि २०१६ मध्ये गोवा ते केपटाऊन असा ४३ दिवसांचा प्रवास केला.[१३] नाविका सागर परिक्रमा संघातील दोन जणांनी केप ते रिओ शर्यतीत २०१७ मध्ये प्रशिक्षणाचा भाग म्हणून सहभाग नोंदविला होता.[१४] टीम तारिणीने त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून INSV म्हादेई आणि INSV तारिणी या जहाजांवरून २२,००० नॉटिकल मैल प्रवास केला.[१५][१६][१७]

नारी शक्ती पुरस्कार

[संपादन]
एस विजया देवी आणि नारी शक्ती पुरस्कार

८ मार्च २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, नाविका सागर परिक्रमेचा भाग असलेल्या INSV तारिणीच्या पथकातील सदस्य लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट पायल गुप्ता, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती आणि लेफ्टनंट शौरग्रकपम विजया देवी यांना महिला सक्षमीकरणात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्कालीन भारतीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदान केलेला हा पुरस्कार आयएनएसव्ही तारिणीच्या टीमच्या वतीने लेफ्टनंट एस विजया देवी यांनी स्वीकारला. योगायोगाने या ईशान्य भारतातील पहिल्या महिला खलाशी आहेत. [१८]

या परिक्रमेसाठी महिला पथकाची निवड करण्यात आली. [१९] [२०] [२१]

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा क्रूसोबत

१४ ऑगस्ट २०१८ रोजी, भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या सहा महिला सदस्यांना हा कठीण प्रवास पूर्ण केल्याबद्दल नौसेना पदक प्रदान करण्यात आले. [२२]

नाविका सागर परिक्रमा II

[संपादन]

पहिल्या पराक्रमाच्या विपरीत, यावेळी फक्त २ महिलांनी जगाला प्रदक्षिणा घालण्याचा निर्णय घेतला गेला. यात भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के यांचा सहभाग होता. या दोघींनी पुन्हा एकदा आयएनएसव्ही तारिणीवरून प्रवास केला.[२३] २ ऑक्टोबर २०२४ रोजी, महात्मा गांधींच्या जयंतीदिनी, पणजी, गोवा जवळील नेव्हल ओशन सेलिंग नोड, आयएनएस मांडवी येथून भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी या परिक्रमेला हिरवा झेंडा दाखवला. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी आयएनएसव्ही तारिणीवर सुमारे आठ महिने प्रवास करून सुमारे २३,४०० नॉटिकल मैल प्रवास करण्याची आणि मे २०२५ पर्यंत परत येण्याची योजना आखली. २९ मे २०२५ रोजी दिलरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीने प्रवासाचा शेवट त्यांच्या मूळ बंदरावर केला. जिथे त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे ध्वजारोहण समारंभ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली गोव्याच्या मोरमुगाव बंदरावर "करेजियस हर्टस, बाउंडलेस सिज" या ब्रीदवाक्याखाली झाला.[२४][२५]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "All about Navika Sagar Parikrama: Indian Navy's all-women team". India Today. 21 August 2017. 6 July 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Through the peril-fraught Navika Sagar Parikrama, these women sailors completed 21,600 nautical miles".
  3. ^ "Sheand thesea". द हिंदू.
  4. ^ "Gutsy women naval officers to return to Goa after circumnavigating the globe in a sailboat". द टाईम्स ऑफ इंडिया.
  5. ^ "Women's Day 2019: meet six women who braved storms, conquered fears to sail into history with INSV Tarini".
  6. ^ "NatGeo India's 'Girls Who Sailed' campaign to tell the tale of grit and determination".
  7. ^ "All-women crew of Navika Sagar Parikrama expedition reaches Fremantle". 2018-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-06-07 रोजी पाहिले.
  8. ^ "Navika Sagar Parikrama – Circumnavigating The Globe on an Indian-Built Sail Boat INSV Tarini by Women Naval Officers". 2017-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-06-07 रोजी पाहिले.
  9. ^ "Sheand thesea". द हिंदू.
  10. ^ "Navika Sagar Parikrama".
  11. ^ "Sheand thesea". द हिंदू.
  12. ^ "As INS Tarini with all-woman crew returns to India, vessel will be flagged-in by Defence Minister Sitharaman".
  13. ^ "Navy vessel with all-women crew arrives in Kochi".
  14. ^ "All-Women Navy Crew Ready For Cape To Rio Yacht Race".
  15. ^ "INSV Tarini: All-women Navy crew reach Goa after circumnavigating globe".
  16. ^ "Around the world – 'Navika Sagar Parikrama' – a historic Indian Navy's all-women expedition".
  17. ^ "INSV Mhadei Flagged Off with an all-women crew".[permanent dead link]
  18. ^ "Navika Sagar Parikrama – 'Nari Shakti Puraskar".
  19. ^ "Through the peril-fraught Navika Sagar Parikrama, these women sailors completed 21,600 nautical miles".
  20. ^ "All-women crew of Navika Sagar Parikrama expedition reaches Fremantle". 2018-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-06-07 रोजी पाहिले.
  21. ^ "Defence Minister Nirmala Sitharaman flags-off all-women crew of Navika Sagar Parikrama from Panaji".
  22. ^ "Vrahma Pal Singh gets Kirti Chakra; Aurangzeb, Major Aditya". टाईम्स ऑफ इंडिया.
  23. ^ "Two Indian Navy Women Officers to embark on the extraordinary sailing expedition – Circumnavigating the Globe".
  24. ^ "INDIAN NAVY TO WELCOME NAVIKA SAGAR PARIKRAMA II CREW AFTER HISTORIC CIRCUMNAVIGATION". PIB.
  25. ^ "Two Indian Navy women officers embark on sailing expedition, circumnavigating the globe". टाइम्स ऑफ इंडिया.

बाह्य दुवे

[संपादन]