नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठः बिहारमध्ये नालंदा नगराच्या परिसरात पूर्वी आंतरराष्ट्रीय विद्याकेंद्र असल्याचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. त्याच परिसरात एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभारण्याच्या योजनेवर एक कार्यगट काम करीत आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन या कार्यगटाचे प्रमुख आहेत. हे विद्यापीठ व्हावे यासाठी लोकसभेने प्रस्ताव संमत केला आहे. आजच्या बिहार राज्यातील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष मिळालेले आहेत सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या युवन सोंग व इसिंग या परकीय प्रवाशांनी केलेल्या प्रवास वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली जात असे तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ उपलब्ध होते त्याचप्रमाणे विद्यापिठात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.
सुरूवात[संपादन]
ज्याठिकाणी नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत त्याच्याच जवळच्या परिसरात नव्याने नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ निर्मितीच्या हालचाली चालू आहेत. त्यासाठीचा नालंदा विद्यापीठ अधिनियम २०१० [१] हा २१ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी भारतीय संसदेच्या राज्यसभेने तर २६ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी भारतीय संसदेच्या लोकसभेने मंजूर केला. अधिनियम मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी तो २१ सप्टेंबर, इ.स. २०१० ला राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला [२] व राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर २५ नोव्हेंबर, इ.स. २०१० पासून नालंदा विद्यापीठ कायदा २०१० आस्तित्वात आला.
परिसर[संपादन]
विश्वविद्यालयाचा परिसर अनेक चौरसमैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. तीनशे खोल्यांचे वसतीगृह, ऐंशी सभागृहे, शंभर अध्यापन कक्ष आणि ग्रहताऱ्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी उंच मनोरे होते. विश्वविद्यालयाच्या परिसरात बागा, उपवने, तलाव, रस्ते होते.
मदत[संपादन]
- जपान आणि सिंगापूरच्या सरकारने या नवीन विद्यापीठासाठी संयुक्तपणे ४.५ अब्ज अमेरिकन डॉलरची मदत देऊ केलेली आहे [३].
- नोव्हेंबर १५, इ.स. २०११ रोजी चीनचे भारतातील राजदूत चांग यान यांनी १ अब्ज अमेरिकन डॉलरांचा धनादेश नवनिर्मित विद्यापीठात ग्रंथालय निर्मितीसाठी भारताकडे सुपूर्द केला [४].
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "नालंदा विद्यापीठ अधिनियम २०१०" (PDF) (इंग्रजी भाषेत). १८ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "भारताचे राजपत्र" (PDF) (इंग्रजी भाषेत). १८ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "नालंदा इंटरनॅशनल युनिवर्सिटी:अ ग्रेट इनिशियेटिव्ह" (इंग्रजी भाषेत). १८ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ पी.टी.आय. "चायना डोनेट्स १ मिलिअन डॉलर फॉर नालंदा युनिवर्सिटी रिवायवल" (इंग्रजी भाषेत). १८ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)