नारायण वासुदेव कोगेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारायण वासुदेव कोगेकर हे भौतिकशास्राचे प्राध्यापक, विज्ञानप्रसारक आणि मराठी विज्ञान परिषदेचे एक संस्थापक सदस्य होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९११ रोजी खामगावमध्ये झाला.[१]र्यांचे बंधू स.वा. कोगेकर हे आधी राज्यशास्त्राचे प्राध्यापक व नंतर सन १९५७-१९६४ या कालावधीसाठी पुण्यातील फर्ग्युसन काॅलेजचे प्राचार्य झाले.

ना. वा. कोगेकरांनी गुंतागुंतीचे शास्त्रीय विषयसुद्धा अत्यंत सोप्या रंजक भाषेत सादर करून विज्ञानलेखक म्हणून लोकप्रियता मिळवली होती. ‘विज्ञानयुग’ या मासिकात ना. वा. कोगेकरांचे लिखाण प्रसिद्ध होई.

ना.वा. कोगेकर हे पुण्याच्या गोपाल गायन समाजात गोविंदराव देसाई यांचेकडे कंठसंगीत शिकत होते. त्या संस्थेत भिंतीवर त्यांचा फोटो लावला आहे.

कोगेकरांनी मुलांसाठी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अणुयुगाची पहाट
  • आंतरिक्ष प्रवास
  • किरणांच्या दुनियेत
  • चंद्रावर सफर
  • जग बदलले या शोधानी
  • निसर्गाचा प्रपंच
  • विज्ञानदीप
  • विज्ञानयुगातील शिल्पकार
  • विज्ञानाचे अलंकार
  • विज्ञानाची वाटचाल
  • संशोधकांचं बालपण

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ना. वा. कोगेकर, परशुराम बर्वे" Check |दुवा= value (सहाय्य). http. 2019-07-25 रोजी पाहिले.[permanent dead link]