नारायणराव सोपानराव बोरावके
Appearance
रावबहादुर नारायणराव सोपानराव बोरावके (जन्म : १७ ऑक्टोबर १८९२) हे पहिले मराठी साखर कारखानदार होते. वास्तविक तत्कालीन महाराष्ट्रातील ते सर्वात मोठे जमीनदार होते. त्यांची मुख्य कर्मभूमी तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यातील (अहिल्या नगर) श्रीरामपूर किंवा बेलापूर होय. या ठिकाणी त्यांचे नावे आजही कित्येक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत. तसेच त्यांचे वारसदारांचे व्यवसाय या ठिकाणी आहेत. पुणे शहरातील 'लक्ष्मीनारायण' सिनेमागृह त्यांचे वारसदारांचे आहे.