Jump to content

नारायणराव कोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारायणराव कोळी हे ठाणे नगरपालिकेत नगरसेवक होते.

नारायणराव कोळी
जन्म नारायणराव कोळी
१५ सप्टेंबर १९१८
ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा, महाराष्ट्र
मृत्यू ६ जुलै १९७७
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा समाजसेवक
मूळ गाव ठाणे
धर्म हिंदू
वडील गोविंदबुवा कोळी
आई गौरीबाई कोळी


जीवन व कारकीर्द

[संपादन]

नारायणराव कोळी यांचा जन्म ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाडा येथे १५ सप्टेंबर १९१८ रोजी झाला.नारायणराव कोळी हे ठाणे नगरपालिकेत २५ वर्षे नगरसेवक होते.इसवी सन १९५२ मध्ये ते चेंदणी कोळीवाडा येथून ठाणे नगरपरिषदेत निवडून आले. इसवी सन १९६२-६३ मध्ये ते ठाणे नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी होते.इसवी सन १९६५ मध्ये ते ठाणे नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.

नारायणराव कोळी चौक

[संपादन]

ठाणे महानगरपालिकेने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दत्तात्रय पारसनीस मार्ग आणि गजानन कोळी मार्ग हे दोन रस्ते जिथे एकमेकांना छेदतात त्या चौकाला नारायणराव कोळी चौक हे नाव दिलेले आहे.

मृत्यू

[संपादन]

दिनांक ६ जुलै १९७७ रोजी त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार,६ नोव्हेंबर २०२५