नापास होण्याची कारणे
![]() ![]() ![]() एखादी गोष्ट कशी करावी हे मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पाच्या परिघात मोडते, म्हणून या लेख/विभागाच्या काही किंवा सर्व मजकुर मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात स्थानांतरीत करण्याची गरज प्रतिपादीत केली गेली आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. एखादी गोष्ट कशी असते ते ज्ञानकोशाच्या परिघात येऊ शकते पण एखादी गोष्ट कशी करावी हे विकिपीडिया परिघात बसत नाही. कृपया, स्थानांतरण पूर्ण झाल्यानंतर {{विकिबुक्समध्येस्थानांतरीत}} साचा लेखात लावावा.
|
नापास मुलांची गोष्ट प्रकल्प[संपादन]
(डी. जी. रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आविष्कार संशोधन प्रकल्प.)
मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी आविष्कार संशोधनस्पर्धा आयोजित केली जाते. २०१६-१२०१७ या शैक्षणिक वर्षात आयोजित झालेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी डी. जी. रुपारेल महाविद्यालयातील सायली वैद्य, प्रज्ञा सारंग, तन्वी देवस्थळी या विद्यार्थ्यांनी ‘नापास मुलांची गोष्ट’ या विषयावर संशोधन-प्रकल्प सादर केला.
अनुत्तीर्ण होण्यामागे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, हे एकच कारण बऱ्याचदा सांगितले जाते; पण अभ्यास का होत नाही, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी सदर विषयाची निवड केली. हा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, समुपदेशक, विषयांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मुलाखती घेतल्या. सर्वेक्षणातून आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून असे दिसून आले की शारीरिक समस्या, मानसिकतेच्या पातळीवरील समस्या (वेळेचे नियोजन न जमणे) दुरावलेले शिक्षक-विद्यार्थी संबंध आणि व्यवस्थेच्या पातळीवरील काही समस्या यांमुळे हा प्रश्न उद्भवतो आहे. या अभ्यासातून विद्यार्थ्यांचा निकाल सुधारावा यासाठी वेगवेगळ्या घटकांकडून जे प्रयत्न केले जातात त्यांना त्याबाबतीत काही माहिती उपलब्ध होऊ शकेल, ज्या आधारावर त्यांना निकाल-सुधारणा-प्रयत्नांचे नियोजन करता येईल. तसेच प्राचार्यांना, समुपदेशकांना, विभागप्रमुखांना काही योजना हाती घेता येतील.