नानासाहेब पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नानासाहेब पवार
जन्म नाव नानासाहेब धोंडिबा पवार
जन्म जून ५, इ.स. १९७६
वालचंद्रनगर, ता. इंदापूर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र सहयोगी प्राध्यापक
साहित्य प्रकार साहित्य व समीक्षा
विषय सामाजिक, वैचारिक
चळवळ ग्रामीण साहित्य चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती यशवंतराव चव्हाण: व्यक्ती आणि वाङमय
साहित्यिक यशवंतराव चव्हाण
पत्नी आरती
अपत्ये अनुश्री, निनाद

नानासाहेब धोंडिबा पवार (जन्म: ५ जून १९७६) हे एक मराठी लेखक व प्राध्यापक आहेत. इ.स. २००२ मध्ये, त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी) पदवी पुर्ण केली.

कारकीर्द[संपादन]

 • इ.स. २००५ साली ते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेतली जाणारी National Eligibility Test (NET) ही परीक्षा उत्तीर्ण झाले.
 • 'निंबाजी पवार लिखित शरद पवार यांचे चरित्र:एक अभ्यास' हा विषयावर एम.फिल. या पदवीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडे नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मार्गदर्शनाने प्रबंधीका सादर केली.
 • पीएच.डी. पदवीसाठी 'यशवंतराव चव्हाण: व्यक्ती आणि वाङमय' या विषयावर राजन गवस यांच्या मार्गदर्शनाने पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला.
 • त्यांनी "कृषीसाहित्याची संकल्पना आणि राजन गवस यांच्या कादंबऱ्यांमधील वैश्विक कृषीविश्व" या विषयावर लघुशोध प्रबंधिका विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जानेवारी २०१४ मध्ये सादर केली.
 • पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय, सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे ४ सप्टेबर २००६ रोजी ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सप्टेंबर २०१९ मधे सहयोगी प्राध्यापक म्हणुन त्यांची पदोन्नती झाली.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • यशवंतराव चव्हाण : व्यक्ती आणि वाङमय (स्नेहवर्धन पब्लिकेशन्स, पुणे, २०१३)
 • भूमिपुत्र (दर्या प्रकाशन, पुणे, २०१६)
 • साहित्यिक यशवंतराव चव्हाण (हर्मिश प्रकाशन, पुणे, २०१८)

मार्गदर्शक[संपादन]

पीएच.डी. पदवीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी -

 • विसपुते शिवाजी जनार्दन - “स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीची कथनपरंपरा” (एप्रिल २०१९ - पुर्ण)
 • रोहमरे उज्ज्वला मधुकर - “डॉ. आनंदीबाई जोशी, ह्यांच्या चरित्राचा सांस्कृतिक व शैलीमीमांसक अभ्यास”
 • चेँडके अमोघशिद्ध - “मध्ययुगीन कालखंडातील वारकरी व सूफी संप्रदाय तुलनात्मक अभ्यास”
 • मोरे सुधीर बबरु- “जगतिकीकरणा परिणामा संदर्भातनव्वदोत्तर मराठी आणि हिंदी साहित्यातील निवडक कादंबऱ्या यांचा तुलनात्मकअभ्यास (एप्रिल २०१९ - पुर्ण)
 • चव्हाण शशिकांत शामराव - “गांधीवादी विचारांचा मराठी साहित्यावरील प्रभाव”
 • शेवाळे प्रगती विश्राम - "भारतीय राजकारण आणि मराठी कविता : कालखंड १९७० ते १९८०"

इतर[संपादन]

 • अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, सोपान नगर (सासवड शाखा)

संदर्भ[संपादन]