नाधवडे (वैभववाडी)
Appearance
नाधवडे
नाधवडे | |
|---|---|
|
गाव | |
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र |
| जिल्हा | सिंधुदुर्ग |
| तालुका | वैभववाडी |
| क्षेत्रफळ | |
| • एकूण | १९.८७ km२ (७.६७ sq mi) |
| लोकसंख्या (2011) | |
| • एकूण | २,५२२ |
| • लोकसंख्येची घनता | १३०/km२ (३३०/sq mi) |
| भाषा | |
| • अधिकृत | मराठी |
| प्रमाणवेळ | UTC+5:30 (IST) |
| पिन कोड |
416810 |

नाधवडे हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक निसर्गसमृद्ध गाव आहे. कोल्हापूर–तळेरे राष्ट्रीय महामार्ग (NH 166G) या गावातून जातो. वैभववाडीपासून अंदाजे ७ किमी अंतरावर हे गाव वसलेले आहे. सह्याद्रीतील करूळ घाट उतरल्यानंतर पठारी आणि मनोहारी असा परिसर नाधवडे गावात दिसतो.

नाधवडे हे ‘उमाळ्यांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असून गोठणा नदीचा उगम येथील नैसर्गिक झऱ्यांमधून होतो. मुंबई–गोवा महामार्गापासून (तळेरे) सुमारे ५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

भौगोलिक माहिती
[संपादन]- गावाचे एकूण क्षेत्रफळ – १९८७ हेक्टर (१९.८७ चौ. किमी)
- नाधवडे गाव ‘गोठणा’ नदीच्या काठावर वसलेले आहे.
- गोठणा नदीचा उगम नाधवड्यातील उमाळ्यांमधून होत असून ती नाधवड्याची गंगा म्हणून ओळखली जाते.
- कोकणातील सुजलाम-सुफलाम प्रदेशात हे गाव वसलेले आहे.
लोकसंख्या आणि प्रशासन
[संपादन]- २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या – **२,५२२**
- पुरुष – **१,१८७**
- महिला – **१,३३५**
- बालकसंख्या (०–६ वर्षे) – **२१५** (८.५२%)
- लिंग गुणोत्तर – **१,१२५** (प्रति १००० पुरुषांमागे ११२५ स्त्रिया)
- बाल लिंग गुणोत्तर – **९०३**
- गावात घरे – **६६१**
- साक्षरता दर – **७५.२१%**
- पुरुष साक्षरता – ८४.०८%
महिला साक्षरता – ६७.४८%**
प्रशासन :
- पोलिस स्टेशन – वैभववाडी
- तहसील कार्यालय – वैभववाडी
- पोस्ट ऑफिस – नाधवडे (पिन ४१६८१०)
सांस्कृतिक वैशिष्ट्ये
[संपादन]नाधवडे हे एक गाव – बारा वाड्या आणि बारा मंदिरे अशी ओळख असलेले गाव आहे.

प्रमुख मंदिरे :
- ग्रामदेवता – नवलादेवी मंदिर

Nawaladevi Temple - गांगेश्वर मंदिर
- महादेव मंदिर

Mahadev Temple - ब्राह्मण देव मंदिर

Brhmandev Temple - विठ्ठल–रखुमाई मंदिर

Vithhal Rukmini Temple - चव्हाटी माता मंदिर

Chavhata Mata Temple - नागेश्वर मंदिर

Nageshwar Temple - स्थानेश्वर मंदिर
- आदिनाथ मंदिर
- हिरवाई मंदिर
- दत्त मंदिर
येथील सर्व मंदिरे वैभवशाली आणि धार्मिक परंपरा जपणारी आहेत.
शिक्षण आणि सार्वजनिक सुविधा
[संपादन]- गावात एक माध्यमिक विद्यालय, तीन उच्च प्राथमिक शाळा व दोन प्राथमिक शाळा आहेत.
- प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध असून सर्वसाधारण आरोग्य सेवा दिली जाते.
- पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध आहे.
- सहकारी सोसायटी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा येथे आहे.
- गावात काजू प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत.
- वीज, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, जलसंधारण इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
धार्मिक व सामाजिक रचना
[संपादन]- बौद्धवाडी येथील नालंदा बौद्धविहार प्रसिद्ध आहे.
- गावात मुस्लिम बांधवांसाठी मज्जिद असून नमाज पठण येथे होते.
- वर्षभर गावात विविध देवतांच्या यात्राआ, पूजा, भजने व उत्सव साजरे होतात.
प्रमुख सण आणि उत्सव
[संपादन]- महाशिवरात्र – तीन दिवस साजरा; नवलादेवी मंदिरातून देवीची पालखी व ढोल-ताशे.
- दत्तजयंती – तीन दिवस धार्मिक कार्यक्रम.
- विठ्ठल–रखुमाई उत्सव – आषाढी व कार्तिकी एकादशीला भजन, दिंड्या.
- शिमगोत्सव – मानाची पालखी व ढोलताशांच्या गजरात उत्सव.
- बारा मंदिरांमध्ये वर्षभर विविध उत्सव साजरे होतात.
पर्यटन स्थळे
[संपादन]- ब्राह्मणदेव मंदिर परिसर – डोंगरपायथ्याशी शांत आणि निसर्गरम्य ठिकाण.
- नवलादेवी मंदिर परिसर – नदीकाठावरील रमणीय व सुशोभित परिसर.
- महादेव मंदिर परिसर – गोठणा नदीकाठी; श्रावणातील विशेष शोभा.
- उमाळे (झरे) – जमिनीतून येणारे निर्मळ पाण्याचे झरे; गोठणा नदीचा उगम.
- नापणे धबधबा– अलीकडे तयार करण्यात आलेला काचेचा पूल विशेष आकर्षण.
- सालवा डोंगर – गावाची हिरवाई व सौंदर्याचे प्रतीक.
- जैवविविधता – परिसरात विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची विपुलता.
संदर्भ
[संपादन]- महाराष्ट्र शासन – जनगणना २०११
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – स्थानिक स्वराज्य संस्था माहिती




