नाथूराम मिर्धा
Appearance
नाथूराम मिर्धा (२० ऑक्टोबर १९२१ - ३० ऑगस्ट १९९६) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाज सुधारक व राजकारणी होते. राजस्थानच्या मारवाड भागातून असलेले मिर्धा १९७१ ते १९८४ व १९८९ ते १९९६ दरम्यान सहावेळा काँग्रेस पक्षाकडून राजस्थानच्या नागौर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले होते. तसेच ते मेडता विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेवरही निवडून आले होते.