नागपूर महानगर परिवहन लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर महानगर परिवहन लिमिटेड ही नागपूर शहरात वाहतूक सेवा चालविण्यासाठी नागपूर महानगरपालिककेची विशेष संस्था आहे. [१]

प्रचालन[संपादन]

२००७ मध्ये, नागपूर महानगरपालिकेने खाजगी पक्षाबरोबर ‘खरेदी-ऑपरिट-ट्रान्सफर’ मॉडेल अंतर्गत बस खरेदी करण्यासाठी आणि मनपाला प्रत्येक बससाठी निश्चित स्वामित्वधन देण्याचा करार केला. महानगरपालिकेला बसेसवरील जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील ५०% रक्कम परत मिळणार असे ठरले होते. [२]

२०१३ मध्ये, मोर भवन येथे नवीन बस स्थानक आणि ढाबा येथे डेपो उभारण्याच्या महानगरपालिकेच्या योजनांसह आणखी बस खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची भारत सरकारनने घोषणा केली गेली [३]

ताफा[संपादन]

एक एनएमपीएल बस

आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेकडे ४३७ बस आहेत ज्या शहर आणि उपनगरामध्ये सेवा पुरवितात. २०१४ मध्ये, स्वीडिश बस उत्पादक स्कॅनिया एबीने घोषित केले की केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार भारताने तयार केलेली पहिली इथेनॉलने चालणारी बस नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यात दिली जाईल. [४] १९८८ च्या मोटार वाहन अधिनियमात सुधारणा करण्यासाठी इथॅनॉलला व्यावसायिक इंधन प्रकार म्हणून मान्यता देण्यासाठी मंत्रालयाने मोटार वाहन संशोधन संघटनेच्या (एआरएआय) मंजुरीची विनंती केली. [५]

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ Anparthi, Anjaya (11 June 2013). "Nagpur Mahanagar Parivahan Ltd to decide on second Nagpur bus operator". Times of India. Nagpur. 23 September 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Anparthi, Anjaya (4 July 2012). "Nagpur Municipal Corporation gets no royalty from city buses for 26 months". The Times of India. Nagpur. 26 September 2014 रोजी पाहिले.
  3. ^ Anparthi, Anjaya (4 August 2013). "More centre assistance for Nagpur bus service on way". The Times of India. Nagpur. 26 September 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Swedish company Scania delivers first ethanol-powered bus in Nagpur". India Today. Jaipur. 27 August 2014. 26 September 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "Fleet of Ethanol-run buses awaiting ARAI clearance". The Hitavada. Nagpur. 18 August 2014. Archived from the original on 2014-10-06. 26 September 2014 रोजी पाहिले.