नागनाथ मानूर (बीड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमारे ७00 यादवकालीन आडाचा इतिहास असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नागनाथ मानूर. कालौघात या गावातील तब्बल साडेसहाशे आड आज बुजून गेले आहेत तर उरले सुरले पाच पन्नास आड जुन्या इतिहासाची साक्ष देत कसेबसे आपले अस्तित्व जपत आहेत. या गावचा गत इतिहास पाहता त्रिकोनी, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी अशा प्रकारचे आड येथे आहेत. काही भागात तर खापरी आड ही बघायला मिळतात. खापरापासून तयार करण्यात आल्यामुळे त्यांना खापरीआड म्हणत. सातशे आड आणि सातशे माड (मंदिर) असलेले मानूर हे परिसरात एकमेव गाव आहे. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "यादवकालीन आडांचा इतिहास झाला जमीनदोस्त". Archived from the original on 2013-03-13.