स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नांदेड विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी नांदेड येथे झाली. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी व हे जिल्हे येतात. या विद्यापीठाचे नाव थोर देशभक्त व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंदतीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.

हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीमवि किंवा SRTMU या नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे जुने नाव नांदेड विद्यापीठ.

'हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी)' हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.

विद्यापीठ गीत[संपादन]

विद्येची अन्‌ पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा - कवी फ. मुं. शिंदे.

विद्येची अन् पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा

मानवतेचा मंगलमय हा इथे खेळतो विश्ववारा ॥धृ ॥

तेजोमय उजळितो प्रकाश

श्रमाचे कष्टाचे आकाश

संपविते सौदामिनी, युगांचा अंधार सारा

विद्येची अन् पवित्रतेची इथे वाहते ज्ञानधारा ॥१॥

नो व्हेईकल डे[संपादन]

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात प्रत्येक गुरुवारी 'नो व्हेईकल डे' पाळला जातो.या दिवशी सकाळी सहा ते रात्री दहा का कालावधीत विद्यापीठ परिसरात कोणत्याही स्वरुपाचे वाहन वापरण्यास अनुमती नाही.

संदर्भ[संपादन]

http://srtmun.ac.in, विद्यापीठाचे संकेतस्थळ.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.