Jump to content

नसीरुद्दीन शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नसिरूद्दीन शाह या पानावरून पुनर्निर्देशित)
नसीरुद्दीन शाह
नसीरुद्दीन शाह
जन्म नसीरुद्दीन शाह
२० जुलै १९५०
बाराबंकी, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७५ पासून
भाषा उर्दू, हिंदी भाषा
प्रमुख चित्रपट चाहत, सरहद
पुरस्कार पद्मभूषण
वडील जन फिशान खान
पत्नी रत्ना
अपत्ये हिबा, इमाद, विवान

नसीरुद्दीन शाह (जन्म : बाराबंकी-उत्तर प्रदेश, २० जुलै १९४९) हे हिंदी भाषेतील एक नाट्य-चित्र अभिनेते व दिग्दर्शक आहेत.

नसीरुद्दीन शहा यांचे प्राथमिक शिक्षण अजमेर येथील शाळेतून आणि महाविद्यालयीन शिक्षण नैनीतालच्या सेन्ट जोसेफ काॅलेजातून झाले. त्यानंतर ते अलीगढ विद्यापीठात दाखल झाले आण पदवीधर होऊन बाहेर पडले. त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशिक्षण घेतले.

वयाच्या १४व्यापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. शेक्सपियरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे त्यांनी भूमिका केलेले पहिले नाटक..

कौटुंबिक माहिती

[संपादन]

नसीरुद्दीन शहांचे पहिले लग्न परवीन मुरादा उर्फ ​​मनारा सीकरी हिच्याशी १ नोव्हेंबर १९६९ रोजी झाले. या लग्नाच्या वेळी नसीरुद्दीन यांचे वय फक्त १९ होते, तर परवीन ३४ वर्षाची होती. ती पाकिस्तानी होती आणि अलीगढ विद्यापीठात शिकत होती.

त्यानंतर नसीरुद्दीन यांनी परवीनला तलाक देऊन अभिनेत्री रत्ना पाठक यांच्याशी १ एप्रिल १९८२ रोजी लग्न केले.

नसीरुद्दीन यांना पहिल्या बायकोपासून हिबा (मुलगी), आणि दुसऱ्या बायकोपासून इमाद व विवान शाह हे मुलगे झाले. हिबा शाह, इमाद शाह आणि विवान शाह हे तिघेही अभिनय क्षेत्रात आहेत.

नसीरुद्दीन शहा यांचे चित्रपट

[संपादन]

नसीरुद्दीन यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

[संपादन]

मोटली ग्रुप

[संपादन]

नासिरुद्दीन शहांनी १९७७मध्ये टॉम ऑल्टर आणि बेंजामिन गिलानी यांना बरोबर घेऊन एक नाट्यसंस्था स्थापन केली आणि तिचे नाव ‘मोटली प्राॅडक्शन’ ठेवले.

नसीरुद्दीन शाह यांना मिळालेले पुरस्कार :-

राष्ट्रीय पुरस्कार

[संपादन]
  • पद्मश्री (१९८७)
  • पद्मभूषण (२००३)

भारत सरकारकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

[संपादन]
  • स्पर्श (१९७९) या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार
  • पार (१९८४) या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार
  • इकबाल (२००६) या चित्रपटासाठी साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार

फिल्मफेयर अवाॅर्ड्‌स

[संपादन]
  • आक्रोश (१९८१) या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार
  • चक्र (१९८२) या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार
  • मासूम (१९८४) या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार
  • प्यार (१९८४) या चित्रपटातील अभिनयासाठी व्हेनिस चित्रपट महोत्सवात व्होल्पी कप

आत्मचरित्र

[संपादन]

'And Then One Day : A Memoir' हे नसीरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र आहे. त्याचा मराठी अनुचाद - आणि मग एक दिवस' (अनुवादक - सई परांजपे).