नवरा माझा नवसाचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवरा माझा नवसाचा
छायाचित्र
निर्मिती तारीख नोव्हेंबर २००४
निर्मिती सचिन पिळगांवकर
दिग्दर्शन सचिन पिळगांवकर
कथा सचिन पिळगांवकर
पटकथा सचिन पिळगांवकर
संवाद संतोष पवार
संकलन आसीफ खान
छाया संजय मेमाणे
गीते जगदीश खेबुडकर
संगीत जितेंद्र कुलकर्णी
ध्वनी मोईन शेख
पार्श्वगायन सोनू निगम
अनुराधा पौडवाल
उत्तरा केळकर
सचिन पिळगांवकर
नृत्यदिग्दर्शन माधव किशन
वेशभूषा विलास खोपटे
रंगभूषा महादेव दळवी
प्रमुख कलाकार सचिन पिळगांवकर
सुप्रिया पिळगांवकर
अशोक सराफ
सुनिल तावडे
निर्मिती सावंत
किशोरी शहाणे
प्रदीप पटवर्धन
जयवंत वाडकर
विजय पाटकर

नवरा माझा नवसाचा हा २००४ सालचा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी चित्रपट आहे जो किट्टू फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित व निर्मितीत केला आहे. नोव्हेंबर २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकरविजय पाटकर ह्यांसारख्या कलाकारांनी. [१][२]

कथानक[संपादन]

वक्रतुंड ऊर्फ वैकी (सचिन पिळगांवकर) व भक्ती (सुप्रिया पिळगांवकर) हे निपुत्रिक जोडपे आहेत ज्यांनी भक्तीच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आहे. वैकी हा एक प्रतिभावान कलाकार आहे पण लग्नाला १० वर्षे होऊनही व्यावसायिक यश मिळालेले नाही. लवकरच, भक्तीला वैकीची आत्या (निर्मिती सावंत) हिच्याकडून कळते की वैकीच्या पालकांनी त्यांची तीन नवजात मुले गमावल्यानंतर गणपतीला नवस केला होता की त्यांना जर निरोगी मुलगा झाला तर ते त्याला गणपतीपुळे इथल्या मंदिरात "विनावस्त्र" घेऊन येतील. तथापि, हा नवस अपूर्ण राहिला कारण शेवटी निरोगी मुलगा झाल्याच्या हर्षवायूने वैकीचे आई-वडील तरुणपणीच मरण पावले. हे ऐकून धक्का बसलेली भक्ती वैकीला हा नवस पूर्ण करण्याची विनंती करते पण ते काम अशक्य असल्याने तिच्या इच्छेचे पालन करण्यास तो मनापासून सहमत नाही. भक्तीच्या हट्टावर मात करण्याच्या प्रयत्नात वैकी व त्याचा बालमित्र किशोर (अतुल परचुरे) हे दोघं एका होतकरू टीव्हीवरील अभिनेत्याला (सतीश तारे) भक्तीसमोर शक्तिशाली ऋषी "उघडे बाबा" म्हणून काम करण्यासाठी नियुक्त करतात. उघडे बाबा वैकी आणि भक्ती यांना सूचना देतात की नवस पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःला पितृत्वात प्रवेश करण्यास सक्षम करण्यासाठी त्यांनी राज्य परिवहन बस मधून वैकीच्या पोशाखात एक पुतळा गणपतीपुळेच्या मंदिरात विनावस्त्र घेऊन जायचा.

वैकी व भक्तीच्या गणपतीपुळेच्या प्रवासाच्या आदल्या रात्री वैकी व किशोर बस डेपो इथे अशा प्रकारचा पुतळा राज्य परिवहन बसमध्ये मागच्या सीटखाली घुसवण्यात यशस्वी झाले. मात्र, त्यांना हे माहीत नाही की त्या रात्री ते दोघं बसमधून बाहेर पडल्यानंतर न दिसलेला आंतरराष्ट्रीय तस्कर बाबू कालिया, जो नुकताच तुरुंगातून पळालेला आहे व त्याने भारत सरकार कडून ८० कोटी किमतीचे हिरे चोरलेले आहेत, याने बसमध्ये प्रवेश केलेला व त्या हिऱ्यांनी भरलेली पिशवी त्या पुतळ्याच्या पोकळीत लपवलेली. चित्रपटाचा उर्वरित कथानक बसमधून गणपतीपुळेला जाताना वैकी आणि भक्तीला आनंददायक परिस्थिती आणि त्यांनी उच्च आणि नीच गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. बसचा प्रवास प्रवाशांसह साहसी आहे, संपूर्ण महाराष्ट्र येथील विविध जीवन, व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि परंपरा या सर्वांचा एकत्रित समूह या प्रवासासाठी एकत्र आलेला आहे. बस कंडक्टर लालू (अशोक सराफ) व बस ड्रायव्हर प्रसाद (सुनील तावडे) यांच्या "नियंत्रण" मध्ये ही बस आहे. वाटेत लालू लावणी नर्तकी शेवंता (किशोरी शहाणे) हिला बसच्या तांत्रिक समस्येच्या वेळी भेटतो आणि जेव्हा ती त्याची आर्थिक समस्या सोडवण्यास मदत करते तेव्हा तो तिच्या प्रेमात पडतो.

प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर मात्र पाठीमागील पुतळा चुकून पाहून लालूला धक्का बसतो आणि ते तो मृतदेह आहे असं मानून तो अख्खी बस डोक्यावर घेतो. असे असूनही वैकी व भक्ती ही दोघं मिळून लालू व प्रसाद आणि बाकीच्या बस प्रवाशांना की तो मृतदेह नसून एक पुतळा आहे आणि गुपचूप बसमधून गणपतीपुळेला नेण्याचे त्याचे काय महत्त्व आहे हे पटवून देण्यात यशस्वी होतात. तरीसुद्धा शेवटी गणपतीपुळे येथे पोहोचल्यावर पोलिसांनी सामोरं जाऊन ह्या मंडळींना धक्का बसतो कारण बाबू कालियाने त्याने चोरलेले हिरे घेऊन गणपतीपुळेच्या बंदरातून दुबई इथे पळून जाण्यासाठी त्या बसमधून प्रवास करत असल्याचा त्यांच्याकडे पुरावा आहे. त्याच वेळी बसमधील एक मुका प्रवाशी (विजय पाटकर) बाबू कालियाला ओळखण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठवलेला गुप्त इन्स्पेक्टर असल्याबद्दल व तो आत्तापर्यंत बोलता येत नसल्याचं नाटक करण्याबद्दल सगळ्यांना कळलं. या संपूर्ण प्रवासात वैकी बाबू कालियाला यापूर्वी भेटलेल्या दुसऱ्या बस प्रवाशाच्या (जयवंत वाडकर) मदतीने बाबू कालियाचे चित्र काढत होता. वैकीने चित्र पूर्ण करताच बाबू कालिया (प्रदीप पटवर्धन) त्याची खरी ओळख उघड करतो आणि त्याने चोरलेले हिरे लपवून ठेवलेल्या पुतळ्याच्या मागणीसह संपूर्ण बसला आणि पोलिसांना बंदुकीच्या जोरावर धरतो.

या टप्प्यावर, वैकी भक्तीला कबूल करतो की ज्या उघडे बाबांना ती आधी भेटली होती ते खोटे होते आणि हा विचित्र नवस पूर्ण करता नये म्हणून त्याने किशोरसोबत ह्या नाटकाची योजना आखली होती. तथापि, भक्ती वैकीला तिच्या विश्वासातून आणि त्यांच्या एकता आणि भगवान गणेशाप्रती असलेल्या भक्तीतून पुतळा मंदिरात घेऊन जाण्याची विनंती करते. त्यामुळे वैकी पुतळ्यासह बसमधून निसटून मंदिराकडे पळतो व बाबू कालियाची टोळी, पोलिस आणि बसमधील प्रवासी त्याचा पाठलाग करतात. ह्या पाठलागात वैकीचे सर्व कपडे पाठलाग करणारे फाडून टाकतात आणि तो पुतळा घेऊन मंदिरात पोहोचून स्वतःला आत बंद करेपर्यंत त्याच्या अंतर्वस्त्रातच उरतो. मंदिरात दरवाजाच्या कडीत अडकल्यामुळे वैकीचा अंतर्वस्त्र देखील फाटतो आणि स्वतः गणपतीने त्याला विवस्त्र करून आपल्या समोर हजर करून खरोखरच नवस पूर्ण केला आहे हे समजून त्याला आनंद होतो. बाबू कालिया आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्यांसाठी अटक केली असताना वैकी पुजाऱ्याच्या दुसऱ्या कपड्यांमध्ये मंदिरातून बाहेर पडतो आणि पुतळ्यातले बाबू कालियाने चोरलेले हिरे पोलिसांना परत करतो. शेवटी बाबू कालियाला पकडल्याबद्दल वैकी व भक्ती यांना भारत सरकारने ₹८ कोटींचे बक्षीस दिले आहे आणि ते दोघं नंतर सुखानं संसार करतात.

कलाकार[संपादन]

पाहुणे कलाकार[संपादन]

गाणी[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बघू हा सिनेमा ?: नवरा माझा नवसाचा (Navra maza navsacha)". cinema-baghu-ya.blogspot.in. 2014-06-01 रोजी पाहिले.
  2. ^ "The Remake Saga - Indian Express". archive.indianexpress.com. 2014-06-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]