नवनाथ कांबळे
नवनाथ कांबळे (जन्म : घारगांव, इ.स. १९५९; - पुणे, १६ मे, २०१७) हे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते. ते एक आंबेडकरवादी आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) नेते होते.[१][२][३][४][५][६][७][८][९][१०]
कांबळे यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील घारगाव होते. त्यांचे कुटुंब १९७२ च्या दुष्काळात गाव सोडून पुण्यात आले व तेथेच स्थायिक झाले. नवनाथ कांबळे यांचे शालेय शिक्षण हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती.[१][२][३][४][५][६][७][८][९][१०]
राजकारण
[संपादन]कांबळे यांनी १९७७पासून दलित पॅंथरमधून सामाजिक कार्यास सुरुवात केली. १९८०मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यावेळी त्यांनी कारावासही भोगला होता. इ.स. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पॅंथरचे पुणे शहराचे शहराध्यक्ष होते. इ.स. १९९० ते १९९६ या काळात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष बनले होते. १९९७मध्ये ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. इ.स. २००२ मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसऱ्यांदा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, १५ मार्च, २०१७ रोजी ते पुणे महापालिकेचे उपमहापौर झाले.[१][२][३][४][५][६][७][८][९][१०]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Banerjee, Shoumojit (2017-05-17). "द हिंदू" (इंग्रजी भाषेत). Pune. ISSN 0971-751X.
- 1 2 3 "शेंगा विक्रेता ते उपमहापौर... नवनाथ कांबळे यांची कारकीर्द!". 24taas.com. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
- 1 2 3 "Pune's deputy mayor Navnath Kambale dies of cardiac arrest". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
- 1 2 3 May 17, Siddharth GadkariSiddharth Gadkari / Updated:; 2017; Ist, 02:30. "Dy mayor Navnath Kamble dies after major heart attack". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-01-14 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)[permanent dead link]
- 1 2 3 "PMC Deputy Mayor Navnath Kamble suffers heart attack, dies at 48". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2017-05-17. 2021-01-14 रोजी पाहिले.
- 1 2 3 "Pune: Newly-elected deputy mayor Navnath Kamble passes away". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
- 1 2 3 "उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-14 रोजी पाहिले.
- 1 2 3 "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन | eSakal". www.esakal.com. 2021-01-14 रोजी पाहिले.
- 1 2 3 "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन". Divya Marathi. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.
- 1 2 3 "पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन". Loksatta. 2017-05-16. 2021-01-14 रोजी पाहिले.