Jump to content

नवद्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवद्वीप
নবদ্বীপ
पश्चिम बंगालमधील शहर

येथील एक मंदिर
नवद्वीप is located in पश्चिम बंगाल
नवद्वीप
नवद्वीप
नवद्वीपचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 23°25′12″N 88°22′12″E / 23.42000°N 88.37000°E / 23.42000; 88.37000

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा नदिया
क्षेत्रफळ ९.८१ चौ. किमी (३.७९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,२५,४४३
  - घनता १२,८०० /चौ. किमी (३३,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
http://www.nabadwipmunicipality.in

नवद्वीप धाम अथवा नबद्वीप (बांग्ला: নবদ্বীপ) हे पश्चिम बंगालच्या मधील एक ऐतिहासिक शहर व हिंदू धर्मातील एक पवित्र स्थान आहे. जगप्रसिद्ध वैष्णव संत चैतन्य महाप्रभू ह्यांचे जन्मस्थान असलेले नवद्वीप बंगालच्या मध्य भागात हूगळी नदीच्या पश्चिम काठावर जलंगी नदीच्या संगमावर वसले आहे.

अंदाजे इ.स. १०६३ साली स्थापन झालेले नवद्वीप बंगालमधील सेन राजवंशाच्या राजधानीचे स्थान होते. येथे वर्षभर अनेक हिंदू उत्सव साजरे केले जातात. येथे अनेक संस्कृत पाठशाळा अजुनही कार्यरत आहेत.