नरेश दधीच
नरेश दधीच (१ सप्टेंबर, १९४४ - ६ नोव्हेंबर, २०२५) हे इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील एक भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. ते ३१ ऑगस्ट २००९ पर्यंत आयुका चे संचालक होते. [१] दधीच हे २०१२ ते २०१६ पर्यंत दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथील सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्र येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्रात एमए अन्सारी अध्यासनस्थ होते.[२]
२०१२ मध्ये ते दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथील क्वाझुलु-नताल विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक होते. याशिवाय त्यांनी पोर्ट्समथ (युनायटेड किंग्डम) आणि बिलबाओ (स्पेन) येथील गुरुत्वाकर्षण संशोधन गटांसोबत देखील काम केले.
त्यांनी शास्त्रीय आणि क्वाँटम गुरुत्वाकर्षण आणि सापेक्षतावादी खगोल भौतिकशास्त्राचा विशेष अभ्यास केला. त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी १०० हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले आणि अनेक पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.
दधीच यांचे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी चीनमधील बीजिंग येथे शैक्षणिक भेटीवर वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. [३]
संदर्भ
[संपादन]- ^ Ramachandran, R. (2003-05-10). "Narlikar's successor". The Hindu. 2008-03-17 रोजी पाहिले.
- ^ Dadhich, Naresh. "Naresh Dadhich @ CTP, JMI". CTP, JMI Website. CTP, Jamia Millia Islamia.
- ^ "ACRU People". Astrophysics and Cosmology research unit, University of Kwazulu-Natal. 27 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 January 2012 रोजी पाहिले.