नरभक्षण
practice of humans eating the flesh or internal organs of other human beings | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उपवर्ग | स्वजातिभक्षण, अपराध (often) | ||
---|---|---|---|
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
![]() |
नरभक्षण म्हणजे मानवांनी इतर मानवांचे मांस किंवा अंतर्गत अवयव खाण्याची कृती किंवा प्रथा. नरभक्षण करणाऱ्या व्यक्तीला नरभक्षक म्हणतात. "स्वजातिभक्षण" या शब्दाचा अर्थ प्राणीशास्त्रात विस्तारित केला गेला आहे ज्यामध्ये प्राण्यांना एकाच प्रजातीच्या व्यक्तींचे काही भाग अन्न म्हणून खाणे असे वर्णन केले आहे.
शारीरिकदृष्ट्या आधुनिक मानव, निअँडरथाल आणि होमो अँटेसेसर यांनी काही प्रमाणात प्लेइस्टोसीन काळामध्ये नरभक्षण केले होते असे ज्ञात आहे.[१][२][३][४][५] इजिप्त मध्ये प्राचीन काळात आणि रोमन काळात तसेच नंतर तीव्र दुष्काळात कधीकधी नरभक्षण केले जात असे.[६][७] लेसर अँटिल्सच्या बेट कॅरिब्सला मानवी मांस खाणारे म्हणून दीर्घकाळापासून प्रतिष्ठा मिळवली, ज्यांच्या नावावरून नरभक्षकणासाठी इंग्रजीमध्ये "कॅनेबलीजम" ह्या शब्दाचा उगम झाला.[८]
फिजी (एकेकाळी "नरभक्षक बेटे" असे टोपणनाव असलेले),[९] अमेझॉन बेसिन, काँगो आणि न्यू झीलंडमधील माओरी लोकांसह, जगातील बहुतेक भागात नरभक्षकपणाचे चांगले दस्तऐवजीकरण केले गेले आहे.[१०] न्यू गिनी आणि सोलोमन बेटांच्या काही भागातही नरभक्षण केले जात असे आणि मेलनेशियाच्या काही भागांमध्ये आणि काँगो बेसिनमधील बाजारपेठांमध्ये मानवी मांस विकले जात असे.[११][१२][१३] आधुनिक युरोपच्या सुरुवातीच्या काळात नरभक्षणाचा एक प्रकार म्हणजे वैद्यकीय कारणांसाठी शरीराचे अवयव किंवा रक्त सेवन करणे असा होता. १७ व्या शतकात शिगेला पोहोचलेली ही प्रथा काही प्रकरणांमध्ये १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातही चालू राहिली.[१४]
दुष्काळाने त्रस्त असलेल्या लोकांकडून कधीकधी शेवटचा उपाय म्हणून नरभक्षणाचा वापर केला जातो. दुर्दैवी डोनर पार्टी (१८४६-१८४७), होलोडोमोर (१९३२-१९३३) आणि उरुग्वेयन एअर फोर्स फ्लाइट ५७१ (१९७२) चा अपघात, ज्यानंतर वाचलेल्यांनी मृतांचे देह खाल्ले, ही सुप्रसिद्ध उदाहरणे आहेत. याव्यतिरिक्त, लैंगिक सुखासाठी नरभक्षण करणाऱ्या लोकांची प्रकरणे आहेत, जसे की अल्बर्ट फिश, इस्सेई सागावा, जेफ्री डाहमर आणि आर्मिन मेईवेस. अलिकडच्या अनेक युद्धांमध्ये, विशेषतः लायबेरिया [१५] आणि काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक[१६] मध्ये, नरभक्षण केले गेले आहे आणि त्याचा तीव्र निषेध केला झाला. सांस्कृतिक कारणांमुळे २०१२ पर्यंत पापुआ न्यू गिनीमध्ये ते पाळले जात होते.[१७][१८]
संदर्भ
[संपादन]- ^ Culotta, E. (October 1, 1999). "Neanderthals Were Cannibals, Bones Show". Science. Sciencemag.org. 286 (5437): 18b–19. doi:10.1126/science.286.5437.18b. ISSN 0036-8075. PMID 10532879.
- ^ Gibbons, A. (August 1, 1997). "Archaeologists Rediscover Cannibals". Science. Sciencemag.org. 277 (5326): 635–637. doi:10.1126/science.277.5326.635. PMID 9254427.
- ^ Rougier, Hélène; Crevecoeur, Isabelle; Beauval, Cédric; Posth, Cosimo; Flas, Damien; Wißing, Christoph; Furtwängler, Anja; Germonpré, Mietje; Gómez-Olivencia, Asier (July 6, 2016). "Neandertal cannibalism and Neandertal bones used as tools in Northern Europe". Scientific Reports (इंग्रजी भाषेत). 6 (1): 29005. Bibcode:2016NatSR...629005R. doi:10.1038/srep29005. ISSN 2045-2322. PMC 4933918. PMID 27381450.
- ^ Davis, Josh (October 4, 2023). "Oldest evidence of human cannibalism as a funerary practice". Natural History Museum – Science News (इंग्रजी भाषेत). February 26, 2024 रोजी पाहिले.
- ^ Carbonell, Eudald; Cáceres, Isabel; Lozano, Marina; Saladié, Palmira; Rosell, Jordi; Lorenzo, Carlos; Vallverdú, Josep; Huguet, Rosa; Canals, Antoni (2010). "Cultural Cannibalism as a Paleoeconomic System in the European Lower Pleistocene". Current Anthropology. 51 (4): 543. doi:10.1086/653807. JSTOR 10.1086/653807.
- ^ Thompson, Jason (2008). A History of Egypt: From Earliest Times to the Present (इंग्रजी भाषेत). American University in Cairo Press. ISBN 978-977-416-091-2.
- ^ Tannahill 1975.
- ^ Myers, Rovert A. (1984). "Island Carib Cannibalism". Nieuwe West-Indische Gids / New West Indian Guide. 58 (3/4): 147–184. ISSN 0028-9930. JSTOR 41849170.
- ^ Sanday, Peggy Reeves (1986). Divine Hunger: Cannibalism as a Cultural System (इंग्रजी भाषेत). Cambridge, UK: Cambridge University Press. p. 151. ISBN 978-0-521-31114-4.
- ^ Rubinstein 2014.
- ^ Edgerton 2002, पान. 109.
- ^ Knauft 1999, पान. 104.
- ^ Siefkes 2022.
- ^ Sugg, Richard (2015). Mummies, Cannibals and Vampires: The History of Corpse Medicine from the Renaissance to the Victorians. Routledge. pp. 122–125 and passim.
- ^ Schmall, Emily (August 1, 2011). "Liberia's elections, ritual killings and cannibalism". GlobalPost. November 22, 2023 रोजी पाहिले.
- ^ "UN Condemns DR Congo Cannibalism". BBC. January 15, 2003. October 29, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Cannibal Cult Members Arrested in PNG". The New Zealand Herald (इंग्रजी भाषेत). July 5, 2012. ISSN 1170-0777. November 28, 2015 रोजी पाहिले.
- ^ Raffaele, Paul (September 2006). "Sleeping with Cannibals". Smithsonian Magazine.