नम्रता सुंदरेसन
Indian cheesemaker | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| नागरिकत्व | |||||
|---|---|---|---|---|---|
| व्यवसाय |
| ||||
| पुरस्कार | |||||
| |||||
नम्रता सुंदरेसन या एक भारतीय सामाजिक उद्योजिका, शेफ आणि चीजमेकर आहेत. त्यांची मैत्रीण आणि भागीदार अनुराधा कृष्णमूर्ती सह त्या २०१७ सालच्या नारी शक्ती पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या.
कारकिर्द
[संपादन]नम्रता सुंदरेसन यांचा जन्म ओडिया माता पित्याच्या पोटी झाला. लग्नानंतर त्या तमिळनाडू राज्यात चेन्नई येथे स्थायिक झाल्या.[१] एका आंतरराष्ट्रीय सल्लागार एजन्सीची स्थापना करून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली.[१] कुन्नूर येथे त्या चीज बनवण्यास शिकल्या. एकदिवस त्यांनी आपली मैत्रीण अनुराधा कृष्णमूर्ती यांच्याशी चर्चा करून चीजमेकर म्हणून काम करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी अपंग महिलांना कामावर ठेवण्याचा देखील निर्णय घेतला.[२] त्यांनी कल्पकता वापरत चीज उत्पादक कासे चीज ची स्थापना केली. या दोघी पारंपारिक पद्धतीने विविध प्रकारचे नैसर्गिक चीज बनवत असत. यात मुख्यतः स्थानिक घटकांचा वापर केला जात असे. कृष्णमूर्ती यांच्या सामाजिक उद्योजकतेच्या पार्श्वभूमीमुळे त्यांनी अपंग महिलांना रोजगार आणि प्रशिक्षण दिले. २०२० पर्यंत, केसे चीज स्टुडिओ ३० हून अधिक प्रकारच्या चीजचे उत्पादन करत होते. त्यात हॅलोमी, फेटा, मोझारेला आणि इतर पदार्थांव्यतिरिक्त जर्दाळू-मध याशिवाय काही लोणचे, औषधी वनस्पती वाळवलेले टोमॅटो, लसूण, मिरपूड, ओरेगॅनो, मध इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो.[३] या सामाजिक उद्योजकतेमुळे या दोघींना २०१७ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१] २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने[४] तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला. हा पुरस्कार भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे.[५]
सुंदरेसन या एक स्वयंशिक्षित स्वयंपाकी आहेत.[६] त्यांनी २०१७ साली लोकलएक्सओच्या अरुंधती बालचंद्रन आणि सुनेती राज यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाच्या क्लबसाठी पेरूचे जेवण बनवण्यास सुरुवात केली.[७] २०१९ मध्ये त्यांनी आपल्या चीजसह कोइंबतूरमधील गोरमेट बाजाराला भेट दिली होती.[८] २०२० पर्यंत, त्यांनी जेवणाच्या २५ ऑर्डस पूर्ण केल्या. अरुंधती बालचंद्रन, सुनेती राज व सुंदरेसन यांनी आपल्या आवडत्या स्वयंपाकाच्या पुस्तकांमधील पाककृती पासून प्रेरणा घेत विविध चविष्ट पदार्थ बनवण्याची एक नवीन मालिका सुरू केली, ज्याला लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.[६]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Sharma, Ankit Sharma (10 April 2018). "Meet The Nari Shakti Puruskar Who Are Empowering Disabled Women". The Logical Indian (इंग्रजी भाषेत). 10 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
- ↑ "A "cheesy" effort to give women wings". The New Indian Express. 19 March 2018. 10 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
- ↑ S, Yogitha (6 January 2020). "Cheese with a cause". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 10 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-16 रोजी पाहिले.
- ↑ Kuttoor, Radhakrishnan (2018-03-07). "Charity 'home maker' gets her due on women's day". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-19 रोजी पाहिले.
- 1 2 Akella, Bhavana (25 February 2020). "City's supper club takes inspiration from cookbooks". Daily Thanti Next (इंग्रजी भाषेत). 10 February 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
- ↑ Omen, Jeryn (31 August 2017). "Do you want to join them for a casual supper?". The New Indian Express. 10 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.
- ↑ Srinivasan, Pankaja (5 September 2019). "Cheese-maker Namrata Sundaresan brings her artisanal brand Kase to Coimbatore". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 10 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2021 रोजी पाहिले.