Jump to content

नंदिता शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nandita Shah (it); নন্দিতা শাহ (bn); Nandita Shah (fr); નંદિતા શાહ (gu); Nandita Shah (hr); Nandita Shah (da); Nandita Shah (es); Nandita Shah (nl); నందితా షా (te); नंदिता शाह (mr); ᱱᱚᱱᱫᱤᱛᱟ ᱥᱟᱦ (sat); ਨੰਦਿਤਾ ਸ਼ਾਹ (pa); নন্দিতা শ্বাহ (as); Nandita Shah (en); Nandita Shah (de); நந்திதா ஷா (ta) Indian homeopath and author (en); Indian homeopath and author (en); నందితా షా (జననం 1959) ఒక భారతీయ హోమియోపతి, రచయిత్రి. (te); இந்திய ஓமியோபதி மருத்துவர் மற்றும் எழுத்தாளர் (ta)
नंदिता शाह 
Indian homeopath and author
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी १५, इ.स. १९५९
भारत
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८१
नागरिकत्व
व्यवसाय
  • homeopath
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नंदिता शाह (१५ फेब्रुवारी, १९५९) ह्या एक भारतीय होमिओपॅथिक डॉक्टर आणि लेखिका आहेत. त्यांनी १९८१ मध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि २००५ मध्ये सॅन्क्युअरी फॉर हेल्थ अँड रिकनेक्शन टू ॲनिमल्स अँड नेचर (SHARAN) ही गैर-सरकारी संस्था स्थापन केली. २०१६ साली त्यांना यासाठी नारी शक्ती पुरस्कार सन्मान प्रदान करण्यात आला.

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

नंदिता शाह यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९५९ रोजी मुंबईत झाला.[] त्यांनी मुंबईतील सीएमपी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून होमिओपॅथीमध्ये डॉक्टर म्हणून विशेषज्ञता पात्रता मिळवली आणि १९८१ पासून त्या होमिओपॅथी मध्ये प्रॅक्टिस करत आहेत.[] शाह १९८५ पासून शाकाहारी आहेत.[] १९९९ मध्ये ऑरोविलला जाण्यापूर्वी त्यांनी न्यू यॉर्कमधील वॉटकिन्स ग्लेन येथील फार्म सॅन्क्युअरी या प्राण्यांच्या निवारा केंद्रात इंटर्न म्हणून काम केले.[]

कारकिर्द

[संपादन]

२००५ मध्ये, शहा यांनी पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सँकच्युअरी फॉर हेल्थ अँड रिकनेक्शन टू ॲनिमल्स अँड नेचर (SHARAN) ही गैर-सरकारी संस्था स्थापन केली.[] त्यांचा असा विश्वास आहे की शाकाहारी जेवण आणि कच्चे अन्न सेवन केल्याने नैराश्य, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या समस्या टाळता येतात.[] भारतातील कोविड-१९ साथीच्या काळात, SHARAN ने मोफत ऑनलाइन स्वयंपाक कार्यशाळा घेतल्या.[]

२०१६ चा नारी शक्ती पुरस्कार मिळवणाऱ्या तमिळनाडूतील चार महिलांपैकी शाह एक होत्या. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रदान केला.[] शाह ह्या "रिव्हर्सिंग डायबिटीज इन २१ डेज" या पुस्तकाच्या लेखिका आहेत.[] दुधातील प्रथिने मधुमेहाचे कारण असू शकतात असे त्यांचे मत आहे.[] २०२० पर्यंत, त्या ऑरोव्हिलमध्ये राहत होत्या.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nandita Shah". www.wholehealthnow.com. 22 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Dr. Nandita Shah". SHARAN. 24 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2021 रोजी पाहिले.
  3. ^ a b Dadhwal, Sheetal (18 February 2020). "'Everything that is advertised is not healthy'". Tribune India (इंग्रजी भाषेत). 16 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2021 रोजी पाहिले.
  4. ^ a b c Anantharam, Chitra Deepa (31 March 2020). "SHARAN offers free online classes for building immunity using plant-based food". The Hindu (इंग्रजी भाषेत). 18 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2021 रोजी पाहिले.
  5. ^ Special correspondent (9 March 2017). "Four from State receive Nari Shakti awards". The Hindu (इंग्रजी भाषेत). 16 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2021 रोजी पाहिले.
  6. ^ Dundoo, Sangeetha Devi (16 November 2014). "Against the norm". The Hindu (इंग्रजी भाषेत). 16 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2021 रोजी पाहिले.