नंदिता महतानी
Indian fashion designer | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | इ.स. १९७२ मुंबई | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय |
| ||||
| वैवाहिक जोडीदार | |||||
| |||||
नंदिता महतानी ह्या एक भारतीय वस्त्रशैली परिकल्पक (फॅशन डिझायनर) आहेत.
कारकिर्द
[संपादन]महतानी या हिंदी चित्रपट अभिनेता डिनो मोरिया सोबत, प्लेग्राउंड नावाची कंपनी चालवतात.[१] महतानी या क्रिकेट खेळाडू विराट कोहलीचे परिकल्पन (डिझायनिंग) आणि शैली परियोजन (स्टायलिंग) करत असतात.[२][३][४]
२०२३ मध्ये नंदिता आणि त्यांची बहीण अनु हिंदुजा यांनी एकत्रित AN-Y1 हा विलासी वस्त्रशैली उत्पादन (लक्झरी फॅशन ब्रँड) निर्माण केला. त्यांचे लक्षवेधी महिलांचे जंपसूट तेव्हापासून ख्यातनाम व्यक्ती आणि परिकल्पक प्रभावक (फॅशन इन्फ्लुएन्सर) यांच्या पसंतीत आल्याचे दिसू लागले आहेत.[५]
वैयक्तिक जीवन
[संपादन]महतानी यांचे लग्न १९९६ साली उद्योजक संजय कपूर यांच्याशी झाले आणि २००० साली हे जोडपे विभक्त देखील झाले.[६] महतानी यांचे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि डिनो मोरिया यांच्याशी देखील काहीकाळ स्नेहसंबंध जुळले होते. शिवाय अभिनेता विद्युत जामवालशी त्यांची सोयरिक देखील जुळली होती.[७][८] नंदिताची बहीण अनु महतानी हिचा विवाह उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा मुलगा संजय हिंदुजाशी झाला.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Dino Morea & Nandita Mahtani's new venture: A social network for the rich & famous". The Economic Times. 20 January 2016. 20 September 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Virat Kohli Easiest And Inspiring To Work With, Says Designer Nandita Mahtani". News18. 19 June 2017. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ↑ Reddy, Sujata (2016). "Elizabeth Hurley, Nandita Mahtani, Seema Khan come together for a fun evening". The Economic Times. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ↑ Alves, Glynda (31 May 2019). "Designer Nandita Mahtani offers a peek into Virat Kohli's wardrobe, says captain loves sunglasses". The Economic Times. 20 September 2020 रोजी पाहिले.
- ↑ "AN-Y1 Fashion Collection | Designer Silk Jumpsuits" (इंग्रजी भाषेत). 2024-01-23 रोजी पाहिले.
- ↑ "Who is Nandita Mahtani, Vidyut Jammwal's Gorgeous Bride-to-be?". India.com. 13 September 2021. 14 September 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Meet Vidyut Jammwal's fiancée Nandita Mahtani - Virat Kohli's stylist and Ranbir Kapoor's 'crush'!". ZeeNews.com. 13 September 2021. 14 September 2021 रोजी पाहिले.
- ↑ "करिश्मा कपूर की सौतन का है विराट कोहली से कनेक्शन, संजय कपूर से की थी पहली शादी". एबीपी लाइव्ह (हिंदी भाषेत). २१ जून २०२५ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]