Jump to content

नंदिता कृष्णा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
নন্দিতা কৃষ্ণ (bn); നന്ദിത കൃഷ്ണ (ml); Nanditha Krishna (nl); Nanditha Krishna (en); नंदिता कृष्णा (mr); నందిత కృష్ణ (te); ਨੰਦਿਤਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ (pa); নন্দিতা কৃষ্ণ (as); Nanditha Krishna (ga); Nanditha Krishna (ast); நந்திதா கிருஷ்ணா (ta) scrittrice indiana (it); ভারতীয় লেখক (bn); écrivaine indienne (fr); idazle indiarra (eu); Indiaas schrijfster (nl); escriptora índia (ca); Indian author (en); escritora indiana (pt); Indian author (en); escritora india (ast); escritora india (gl); escritora india (es)
नंदिता कृष्णा 
Indian author
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९५१
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नंदिता कृष्णा (जन्म:१९५१) ह्या एक भारतीय लेखिका, पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. भारत सरकारने त्यांना २०१५ मध्ये भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, पहिला नारी शक्ती पुरस्कार दिला. त्या चेन्नईतील सीपी रामास्वामी अय्यर फाउंडेशनच्या अध्यक्षा असून त्यांनी आध्यात्मिक व प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत.

नंदिता कृष्णा (२०१४)

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पूर्वायुष्य

[संपादन]

नंदिताचा जन्म १९५१ मध्ये झाला होता व नंदिता जगन्नाथन हे त्यांचे विवाहपूर्वीचे नाव होते. त्या उच्च पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून जन्मलेल्या आहेत.

डॉ. सी.पी. रामास्वामी अय्यर, हे नंदिताचे पणजोबा (वडिलांचे आजोबा) होते. डॉ अय्यर हे मद्रास प्रेसिडेन्सीचे वकील आणि महाधिवक्ता, त्रावणकोर राज्याचे दिवाण आणि अन्नामलाई आणि विद्यापीठ आणि त्रावणकोर विद्यापीठाचे कुलगुरू होते. नंदिता ह्या ए.आर. जगन्नाथन आणि शकुंतला जगन्नाथ यांच्या कन्या आहेत. जगन्नाथ हे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तर शकुंतला जगन्नाथ ह्या मुंबई येथील भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या उपमहासंचालक आणि प्रादेशिक संचालक होत्या. तसेच त्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हिंदू धर्म - अ‍ॅन इंट्रोडक्शन अँड गणेशा या पुस्तकाच्या लेखिका देखील होत्या. सीआर पट्टाभिरामन हे नंदिताचे आजोबा (आईचे वडील) होते. पट्टाभिरामान हे भारत सरकारचे माजी कायदा मंत्री होते.

तिने कॅथेड्रल अँड जॉन कॉनन हायस्कूल, मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९७० मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई येथून पदवी प्राप्त केली आणि १९७५ मध्ये मुंबई विद्यापीठातून द आयकॉनोग्राफी ऑफ विष्णू नारायण या विषयावर पीएच.डी. मिळवली. याच बरोबर आपल्या संशोधनाच्या काळात त्या हेरास विद्वान (उच्च शिक्षण भूमिका विश्लेषण विद्वान) होत्या.[]

२०१६ मध्ये नंदिता यांनी पश्चिम बंगालच्या विद्यासागर विद्यापीठाकडून साहित्यात मानद पदवी (डॉक्टरेट) प्राप्त केली आहे.[]

कारकिर्द

[संपादन]
मॅजिक लॅम्प टीव्ही

१९७२ ते १९७४ पर्यंत त्या मुंबईवरील लोकप्रिय "मॅजिक लॅम्प" टीव्ही मालिकेच्या सूत्रसंचालक आणि सादरकर्त्या होत्या.

१९७४ मध्ये लग्नानंतर त्या चेन्नईला गेल्या आणि १९७८ मध्ये त्यांनी पारंपारिक कला आणि हस्तकलेसाठी चेन्नई येथे सीपी आर्ट सेंटरची स्थापना केली. हे चेन्नई येथील पहिले कला दालन आहे.[]

१९८१ मध्ये त्यांना सीपी रामास्वामी अय्यर फाउंडेशन (सीपीआरएएफ) च्या संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१३ मध्ये या संस्थेवर त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. या फाउंडेशनचे मुख्यालय भारतातील चेन्नई येथे, एल्डम्स रोडवरील "द ग्रोव्ह" येथे आहे. हे मुख्यालय म्हणजे सीपी रामास्वामी अय्यर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आहे.[]

१९८१ मध्ये, सीपी रामास्वामी अय्यर फाउंडेशनने सीपीआर इन्स्टिट्यूट ऑफ इंडोलॉजिकल रिसर्चची स्थापना केली. ही संस्था मद्रास विद्यापीठाशी इतिहास आणि पर्यावरण अभ्यास या विषयात पीएच.डी. पदवीसाठी संलग्न होती. नंदिता यांना यासंस्थेच्या संचालक आणि नंतर प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले.

१९८३ मध्ये, नंदिता यांनी द ग्रोव्ह स्कूलची स्थापना केली. ही शाळा २००६ मध्ये कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनशी संलग्न झाली.[]

पुढे १९८५ मध्ये, त्यांनी सीपीआरएएफ कॅम्पसमध्ये ऑटिझम (आत्मकेंद्रीपणा), डिस्लेक्सिया(शिकण्यात किंवा वाचण्यात अडचण असणे), लर्निंग डिसअ‍ॅबिलिटीज (शिकण्याची अक्षमता) आणि तत्सम मानसिक समस्या असलेल्या मुलांसाठी सरस्वती केंद्र लर्निंग सेंटरची स्थापना केली.[]

१९८९ मध्ये, त्यांनी भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि सी.पी. रामास्वामी अय्यर फाउंडेशनच्या संयुक्तविद्यमाने सीपीआर पर्यावरण शिक्षण केंद्राची स्थापना केली. याशिवाय त्यांनी दक्षिण भारतातील ५३ पवित्र वृक्षांचे पुनर्संचयित देखील केले आहे. याच बरोबर त्यांनी कोटा आणि कुरुंबा जमातींना त्यांच्या पारंपारिक कौशल्यांना उत्पन्नाचा स्रोत म्हणून विकसित करण्यासाठी प्रशिक्षित केले.[] तामिळनाडूच्या आठ टाक्यांमध्ये पारंपारिक पावसाच्या पाण्याचे संकलन करून या टाक्यांना पुनरुज्जीवित केले आहे.[] शिवाय त्यांनी पर्यावरणीय शिक्षणात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम तयार केले आहेत. चेन्नईमध्ये ऑटिझम (आत्मकेंद्रीपणा) आणि डिस्लेक्सिया (शिकण्याची अक्षमता) असलेल्या मुलांसाठी पाळीव प्राण्यांच्या सहवासातून निर्माण होणारा उपचार कार्यक्रम, ज्याचे नाव डॉ. डॉग आहे, सुरू केला. चेन्नईमध्ये मुलांना त्यांच्या अन्नाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीचा काइंडनेस किड्स हा कार्यक्रम सुरू केला.[] नंदिता ह्या सीपीआर पर्यावरण शिक्षण केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या "पर्यावरणीय वारसा आणि पवित्र स्थळांचे संवर्धन" या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या ENVIS (पर्यावरणीय माहिती प्रणाली) वेबसाइटवर पोस्ट केलेल्या भारताच्या पर्यावरणीय परंपरांचे दस्तऐवजीकरण करत आहे.

२००१ मध्ये, त्यांनी सी.पी. रामास्वामी अय्यर कुटुंबाच्या ४५० वर्षे जुन्या कौटुंबिक घराचे रूपांतरण शकुंतला जगन्नाथन लोककला संग्रहालय आणि अल्प उत्पन्न असलेल्या मुलांसाठीचे रंगम्मल विद्यालयात केले.

२००५ मध्ये, त्यांनी कुंभकोणममधील सर सीपी रामास्वामी अय्यर मेमोरियल स्कूल ताब्यात घेतले. आता ही शाळा इंग्रजी माध्यमाची असून येथे अत्यल्प उत्पन्नाचे साधन असलेल्या गरीब घरच्या मुलांसाठी मोफत शिक्षण जाते.[१०]

त्या एसएसकेव्ही शाळा आणि महाविद्यालये चालवणाऱ्या कॉन्जीवरम हिंदू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा देखील आहेत.[११]

त्या भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या माजी सदस्या आहेत (२०१५-२०१८) आणि बेंगळुरू येथील भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या दक्षिणी प्रादेशिक केंद्राच्या (SRC) देखरेख/सल्लागार समितीच्या सह-सदस्य आहेत.

संशोधन

[संपादन]

नंदिता यांनी भारतीय कला इतिहास आणि भारताचा पर्यावरण इतिहास या विषयावर संशोधन करून यावर अनेक शोधनिबंध, लेख आणि पुस्तके लिहिली आहेत.[]

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

१९७२ पासून नंदिता यांनी इव्हज वीकली आणि इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या दोन इंग्लिश साप्ताहिकासाठी लेखन सुरू केले. १९७४ मध्ये चेन्नईला गेल्यानंतर, त्यांनी द हिंदू आणि इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियासाठी लेखन केले. विशेष म्हणजे नंदिता यांच्या २६ मार्च १९७८ रोजी इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियामध्ये "स्लटर फॉर सायन्स" या विषयावरील लेखामुळे भारतातून रीसस माकडांच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

२००१ ते २००७ पर्यंत द संडे एक्सप्रेस वर्तमान पत्रात त्यांचा "क्रिएशन्स" हा स्तंभ नियमितपणे छापून येत होता.[१२]

त्यांनी २०१७ पासून, ओपन मासिकासाठी नियमितपणे लेख निर्मिती केली आहे.[१३] शिवाय द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या संपादकीय पृष्ठावर त्यांचा एक स्तंभ देखील आहे.[१४]

पुस्तके

[संपादन]
  • बिलीव्ह इन युअर्सेल्फ - स्वामी विवेकानंद (अलेफ) कडून जीवन धडे, २०२० -आयएसबीएन 978-93-89836-10-3
  • ग्रोव्हज अँड गॉड्स ऑफ तमिळनाडू, (आयसीएचआर, बंगळुरू), २०१९
  • लिव्ह अँड लेट अदर्स लिव्ह- महावीर (अलेफ) कडून जीवन धडे, २०१९ -आयएसबीएन 978-93-88292-42-9
  • यु आर द सुप्रीम लाईट - आदिशंकराचार्य (अलेफ) कडून जीवन धडे, २०१८ -आयएसबीएन 978-93-87561-38-0
  • द बुक ऑफ अवतार्स आंड डिव्हिनिटीज (पेंग्विन, भारत), २०१८ -आयएसबीएन 978-0-143-44688-0
  • हिंदुईस्म अँड नेचर (पेंग्विन, भारत), २०१७ -आयएसबीएन 0143427830
  • देव प्रतिमा (CPR प्रकाशन), 2016 -आयएसबीएन 978-93-85459-01-6
  • सेक्रेड ग्रोव्हज ऑफ इंडिया - एक संग्रह (सीपीआर पब्लिकेशन्स), २०१४ -आयएसबीएन 978-81-86901-24-3
  • पेंटिंग्ज ऑफ द वरदराज पेरुमल टेंपल, कांचीपुरम, (सीपीआर पब्लिकेशन्स), २०१४ -आयएसबीएन 978-81-908305-0-8
  • सेक्रेड प्लॅन्ट ऑफ इंडिया (पेंग्विन, भारत), २०१४ -आयएसबीएन 9780143066262
  • मद्रास देन, चेन्नई नाऊ (रोली बुक्स), २०१३ -आयएसबीएन 978-81-7436-914-7
  • सेक्रेड ॲनिमल्स ऑफ इंडिया (पेंग्विन इंडिया), २०१० -आयएसबीएन 9780143066194
  • हग अ ट्री (न्यू होरायझन मीडिया), २०१० -आयएसबीएन 978-81-8493-437-3
  • मद्रास-चेन्नई, इट्स हिस्टरी अँड एन्व्हायर्नमेंट (न्यू होरायझन मीडिया) २००९ -आयएसबीएन 978-81-8493-229-4
  • बुक ऑफ डेमन्स (पेंग्विन इंडिया), २००७ -आयएसबीएन 9780143102021
  • फोक आर्ट्स ऑफ तमिळनाडू (सीपीआर प्रकाशने), २००६ -आयएसबीएन 81-901484-7-8
  • फोक टॉयस ऑफ साऊथ इंडिया (सीपीआर प्रकाशने), २००६ –आयएसबीएन 81-901484-9-4
  • बुक ऑफ विष्णू (पेंग्विन इंडिया), २००१ -आयएसबीएन 9780670049073
  • वराहिश्वर टेम्पल, दमल (CPR प्रकाशन), 2001 –आयएसबीएन 978-81-908305-5-3
  • बालाजी-व्यंकटेश्वरा (वकिल), 2000 -आयएसबीएन 81-87111-46-1
  • पेंटेड मॅन्युस्क्रिप्ट्स ऑफ द सरस्वती महाल लायब्रेरी, थंजावूर (द महाराजा सेरफोजी सरस्वती महाल लायब्रेरी) रंगवलेल्या हस्तलिखिते, १९९४
  • आर्ट्स अँड क्राफ्ट्स ऑफ तामिळनाडू (मॅपिन), १९९२ -आयएसबीएन 0-944142-21-4
  • गणेश (वाकिल्स), १९९२ -आयएसबीएन 978-81-8462-004-7

संपादित

[संपादन]

मुलांसाठी

[संपादन]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

२०१५ मध्ये त्यांचे नेतृत्व आणि विशेष कामगिरीसाठी त्यांना पहिला नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जागतिक महिला दिनी तत्कालीन भारतीय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आला होता.[१५]

त्यांच्या इतर पुरस्कारांमध्ये अँबेसेडर फॉर पीस अवॉर्ड (२०१७); इंटरनॅशनल सोशल अ‍ॅक्टिव्हिस्ट अवॉर्ड (२०१७) सर जे.सी. बोस मेमोरियल अवॉर्ड (२०१४); डॉ. एम.एस. स्वामिनाथन अवॉर्ड फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन (२००४); स्त्री रत्न (१९९८); आणि आउटस्टँडिंग वुमन ऑफ एशिया (१९९७) यांचा समावेश आहे. सीपीआर पर्यावरण शिक्षण केंद्राला त्यांच्या संचालकपदाखाली इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार (१९९६) मिळाला. याशिवाय त्यांनी भारतीय संस्कृती आणि पर्यावरणावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित केल्या आहेत.

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

नंदिता यांचे लग्न एस. चिन्नी कृष्णा यांच्याशी झाले. चिन्नी कृष्णा हे एक उद्योगपती आहेत आणि ते ब्लू क्रॉस ऑफ इंडिया या प्राणी हक्क संस्थेचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. नंदिता ह्या ब्लू क्रॉस ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची सदस्य देखील आहेत.[१६] या जोडप्याला दोन मुले आहेत - डॉ. प्रशांत कृष्णा, जे सीपी रामास्वामी अय्यर फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत आणि रुद्र कृष्णा, जे ओनस ऑफ कर्मा आणि ब्रह्मा टॉवर्सचे लेखक आहेत.[१७]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Nanditha Krishna". www.nandithakrishna.in. 27 August 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Nanditha Krishna – Indian Knowledge Systems".
  3. ^ "C.P. Ramaswami Aiyar Foundation". www.cprfoundation.org. 27 August 2020 रोजी पाहिले.
  4. ^ Sarumathi, K. (7 February 2015). "Where culture, conservation, art and education converge". The Hindu.
  5. ^ "The Grove School". www.thegroveschool.in. 27 August 2020 रोजी पाहिले.
  6. ^ "Saraswathi Kendra Learning Centre for Children". www.saraswathikendra.org. 27 August 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "C.P.R. Environmental Education Centre". www.cpreec.org. 27 August 2020 रोजी पाहिले.
  8. ^ Sacred Tanks of South India, (CPR Publications), 2009. आयएसबीएन 978-81-86901-05-2
  9. ^ "Kindness Kids". kindnesskids.org. 27 August 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "Sir C.P. Memorial School". www.cprfoundation.org. 27 August 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "About us". www.sskvcollege.com. 27 August 2020 रोजी पाहिले.
  12. ^ https://www.nandithakrishna.in/articles.html NANDITHA KRISHNA ARTICLES
  13. ^ "Are Indian Slaughter Houses Safe?". 3 July 2020.
  14. ^ "NEP and education for the future". 7 August 2020.
  15. ^ "Stree Shakti Puraskar and Nari Shakti Puraskar presented to 6 and 8 Indian women respectively". 9 March 2015.
  16. ^ "Board members of Blue Cross of India - Animal Welfare Organisation". 2023-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-03-16 रोजी पाहिले.
  17. ^ Krishna, Rudra (28 January 2019). Brahma Towers: From the Case Files of Sachin Vittaldev. Amazon Digital Services LLC - KDP Print US. ISBN 978-1795258999.