नंदकुमार विष्णू मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नंदकुमार मोरे

पूर्णनाव. नंदकुमार विष्णू मोरे (जन्म : डिसेंबर 1978) हे मराठी समीक्षक, लेखक असून शिवाजी विद्यापीठ, काेल्हापूर च्या मराठी विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत असतात.[१] भाषाविज्ञान, बोली अभ्यास, कादंबरी आणि आधुनिक मराठी साहित्य हे त्यांचे अध्यापन विषय आहेत. .[ दुजोरा हवा]

नंदकुमार माेरे मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

शिक्षण[संपादन]

एम. ए.(मराठी) पीएच. डी. मराठी कादंबरीची समाजभाषावैज्ञानिक चिकित्सा हा विषय घेऊन २००८ मध्ये त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. [१]

शैक्षणिक पारितोषिके[संपादन]

Nandkumar More

1) विष्णू  नारायण कुलकर्णी भाषाभूषण पारितोषिक

2) माधव जूलियन पारितोषिक

3) उमा गिरीष पारितोषिक

4) प्रा. रामचंद्र कृष्णाजी पानसे पारितोषिक

5) जयश्री गुरूराज हनसे पारितोषिक. (सर्व पारितोषिके शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून)

ग्रंथ लेखन[संपादन]

महाराष्ट्र शासनाचा सन 2011-12 चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी ‘नरहर कुरुंदकर’ पुरस्कार समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) या ग्रंथास मिळाला. [२]

1. ‘समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) [३]

2. ‘भाषासंवाद’ सहकार्याने लेखन (सायन पब्लिकेशन, पुणे)[४]

3. ‘समीक्षापद्धती : सिद्धांत आणि उपयोजन’ सहकार्याने संपादन (पद्मगंधा प्रकाशन, पुणे)[५]

Pohoto

पुरस्कार  [संपादन]

महाराष्ट्र शासनाचा सन 2011-12 चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी ‘नरहर कुरुंदकर’ पुरस्कार.

प्रकाशित शोधनिबंध       [संपादन]

नवभारत, नव अनुष्टुभ, भाषा व जीवन, नवाक्षर दर्शन, द.म.सा.प., सृजन, मुक्त शब्द, युगवाणी, मुराळी इत्यादी मान्यताप्राप्‍त नियतकालिकांमधून जवळपास चाळीस शोधनिबंध प्रकाशित

इतर लेखन : नियतकालिके, दिवाळी अंकांमधून विविध विषयांवर लेखन, पुस्तक परीक्षणे प्रकाशित.

संपादन[संपादन]

: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळचे दहावी मराठी कुमारभारतीसाठी संपादक मंडळ सदस्य आहेत
 1. स्वच्छंद दीपावली अंकाचे 10 वर्षे संपादन - प्रकाशन
 2. अरुणोदय शिक्षण विशेषांक मुख्यसंपादक
 3. ओंकार वार्षिक अंकाचे सलग चार वर्षे संपादन,

शोधनिबंध[संपादन]

अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय विविध चर्चासत्रांमधून शोधनिबंध सादर

संशोधन प्रकल्प [संपादन]

:  चंदगडी बोली : इतिहास आणि भूगोल (विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली साचा:Fact

कार्यशाळांचे आयोजन  [संपादन]

 1. लेखन, वाचन कौशल्यविकास कार्यशाळा,
 2. वाङ् मयीन कलाकृती : वाचन, आस्वाद आणि आकलन,
 3. संगणकावर मराठीचा वापर व मराठी युनीकोड साचा:Fact


संदर्भ[संपादन]

 1. a b शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संस्थळावरील व्यक्ति परिचय दिनांक २० जानेवारी २०१७ रोजी दुपारी १२ वाजून १४ मिनीटांनी जसा अभ्यासला
 2. ^ उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार जाहीर हे वृत्त नवशक्ती वृतपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत दिनांक २० जानेवारी २०१७ रोजी जसे अभ्यासले.
 3. ^ बुकगंगा डॉटकॉमवर ग्रंथाची प्रत दिनांक २० जानेवारी २०१७ रोजी दुपारी १२ वाजता जशी अभ्यासली
 4. ^ डॉट कॉमवर ग्रंथाची प्रत दिनांक २१ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११.३५ वाजता जशी अभ्यासली
 5. ^ बुकगंगा डॉट कॉमवर ग्रंथाची प्रत दिनांक २० जानेवारी २०१७ रोजी दुपारी १२ वाजता जशी अभ्यासली