धुरंधर (चित्रपट)
| शीर्षक | धुरंधर, ধুরন্ধর, دهوراندار |
|---|---|
| गट-प्रकार | हेरपट, action thriller |
| प्रकाशन तारीख | ५ डिसेंबर 2025 |
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी भाषा |
| दिग्दर्शक | आदित्य धर |
| पटकथा | आदित्य धर |
| प्रमुख कलाकार | रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल |
| संगीतकार | शाश्वत सचदेव |
| निर्माता | आदित्य धर, ज्योती देशपांडे |
| Soundtrack release | Dhurandhar |
| रंग | color |
| EIRIN film rating | R15+ |
धुरंधर हा २०२५ चा हिंदी भाषेतील साहस मारधाड हेरपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आदित्य धर यांचे असून धर हे सह-निर्माते देखील हे. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओजच्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका असून मानव गोहिल, दानिश पांडोर, सौम्या टंडन, गौरव गेरा आणि नवीन कौशिक यांनी सहाय्यक भूमिकेत काम केले आहे.[१][२]
हा चित्रपट भू-राजकीय तणाव आणि भारताच्या संशोधन आणि विश्लेषण विभाग अर्थात रॉ द्वारे चालवल्या जाणाऱ्या गुप्त कारवायांवर आधारित आहे. हा चित्रपट भारत पाकिस्तान मधील भूतपूर्व घटनांपासून प्रेरित आहे. विशेषतः ऑपरेशन लियारी, २००८ मधील मुंबई हल्ला, टोळ्या आणि गुन्हेगारी गटांवरील कारवाईशी संबंधित घटनांपासून याची निर्मिती करण्यात आली आहे.[३] हा आतापर्यंत बनवलेल्या सर्वात मोठ्या भारतीय चित्रपटांपैकी एक असून याची लांबी सुमारे २१४ मिनिटांची आहे.
त्यानंतरचा चित्रपट, धुरंधर: भाग २ - रिव्हेंज, १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.[४]
कलाकार
[संपादन]- रणवीर सिंग - हमजा अली मजारी / जसकीरत सिंग रंगी च्या भूमिकेत
- अक्षय खन्ना - रेहमान डकैतच्या भूमिकेत
- आर. माधवन - अजय सन्याल, आयबीचे संचालक ( जित डोवाल यांच्यावर आधारित )
- अर्जुन रामपाल - मेजर इक्बालच्या भूमिकेत , ISI (इलियास काश्मिरीवर आधारित)
- संजय दत्त - एसपी चौधरी असलम च्या भूमिकेत
- सारा अर्जुन - जमीलची मुलगी यालिना जमालीच्या भूमिकेत
- राकेश बेदी - जमील जमाली म्हणून
- नवीन कौशिक - डोंगा च्या भूमिकेत
- मानव गोहिल - सुशांत बन्सल, आयबीचे उपसंचालक च्या भूमिकेत
- दानिश पांडोर - उझैर बलोच, रहमानचा चुलत भाऊ आणि सेकंड-इन-कमांड च्या भूमिकेत
- गौरव गेरा - मोहम्मद आलम च्या भूमिकेत
- राज झुत्शी - जनरल शमशाद हसनच्या भूमिकेत
- सौम्या टंडन - रहमानची पत्नी उल्फतच्या भूमिकेत
- बिमल ओबेरॉय - शिरानी, बलुच युनायटेड फोर्स (BUF) चे नेते म्हणून
- आसिफ अली हैदर खान - बाबू डकैतच्या भूमिकेत
- मधुरजीत सरगी - प्रभनीत सिंगच्या भूमिकेत
- मुस्तफा अहमद - रिझवान शाह च्या भूमिकेत म्हणून
- उदयबीर संधू - गुरबाज सिंग "पिंडा" च्या भूमिकेत
- गितिक्का गंजू धर - शबनम च्या भूमिकेत
- उमर नावेद - निर्बान झयान च्या भूमिकेत
- रूहल्लाह गाझी - सियाही च्या भूमिकेत
- आदित्य उप्पल - एएसपी ओमर हैदर (ओमर शाहिद हमीदवर आधारित)
- सौरव खुराना - बाबा लाडला/बबला च्या भूमिकेत
- सुनील शर्मा - शौकत च्या भूमिकेत
- अझिंक्या मिश्रा - फैजल बलोच, रेहमानचा धाकटा मुलगा
- हिटुल पुजारा - रहमानचा मोठा मुलगा नईम बलोचच्या भूमिकेत
- अश्विन धर अर्शद पप्पूच्या भूमिकेत
- अभय अरोरा - यासिर अराफत च्या भूमिकेत
- दानिश इक्बाल - दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत
- अंकित सागर - जावेद खानानीच्या भूमिकेत
- मुश्ताक नाईक - अल्ताफ खानानीच्या भूमिकेत
- विनोद थरानी - आझम चीमा च्या भूमिकेत
- फैज खान - साजिद मीरच्या भूमिकेत
- संजय मेहता - अब्दुल भुट्टोवीच्या भूमिकेत
- कार्ल अँड्र्यू हार्टे - डेव्हिड हेडलीच्या भूमिकेत
- दलविंदर सैनी - अजमल कसाबच्या भूमिकेत
- अकैशा वत्स - उझैरच्या पत्नीच्या भूमिकेत
- भाषा सुंबळी - वीणा च्या भूमिकेत
- विजेंदर सिंग - अमरजित सिंग ब्रारच्या भूमिकेत
- गुरलाल संधू - बलविंदर संधूच्या भूमिकेत
- विवेक सिन्हा - जहूर मिस्त्री / जाहिद अखुंद च्या भूमिकेत
- राजेश सांगवान - इब्राहिम अथरच्या भूमिकेत
- मशहूर अमरोही - नवाब शफीकच्या भूमिकेत (नवाज शरीफवर आधारित)
- संजय मेहंदीरत्ता - आकिब अली जरवारी (आसिफ अली झरदारी यांच्यावर आधारित)
- आकाश खुराणा - देवव्रत कपूर, परराष्ट्र मंत्री (जसवंत सिंग यांच्यावर आधारित)
- अली रझा नामदार - केएस भुल्लर, R&AW चे विशेष सचिव (एएस दुलत यांच्यावर आधारित)
- हिमांशू गोखानी - DGP प्रशांत कुमार , उत्तर प्रदेश पोलिस म्हणून
- सिद्धार्थ भारद्वाज - बळवंतच्या भूमिकेत
- रजत अरोरा - मुक्का च्या भूमिकेत
- गुरसेवक सिंग - लस्सानच्या भूमिकेत
- क्रिस्टल डिसूझा - "शरारत" गाण्यात नर्तकीच्या भूमिकेत क्रिस्टल डिसूझा
- आयेशा खान -‘शरारत’ गाण्यातील नृत्यांगना
निर्मिती
[संपादन]जुलै २०२४ मध्ये रणवीर सिंग यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली होती.[५] डिसेंबर २०२४ मध्ये याचे शीर्षक धुरंधर असल्याचे जाहीर करण्यात आले.[६] हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटना, भू-राजकीय संघर्ष आणि रॉ च्या गुप्त कारवायांपासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.[७] हा चित्रपट पाकिस्तानातील कराची येथील ल्यारी भागात स्थानिक टोळ्या आणि गुन्हेगारी सिंडिकेटविरुद्ध पाकिस्तान सरकारच्या नेतृत्वाखालील कारवाई "ऑपरेशन ल्यारी"वर आधारित आहे.[८][९]
जुलै २०२४ मध्ये, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबत रणवीर सिंग यांना मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आले.[१०][११] ऑक्टोबर २०२४ मध्ये, सिंग यांच्यासोबत सारा अर्जुनला अभिनेत्री म्हणून निवडण्यात आले.[१२] सिंग रॉ एजंटची भूमिका साकारत आहे, तर माधवन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका साकारत असल्याचे वृत्त आहे.[१३][१४] दत्तचे पात्र पाकिस्तानी पोलिस अधिकारी चौधरी अस्लम खानवर आधारित आहे, खन्नाचे पात्र गँगस्टर रहमान डकैतवर आधारित आहे, तर रामपालचे पात्र पाकिस्तानी अतिरेकी-दहशतवादी इलियास काश्मिरीवर आधारित आहे.[१५] सिंगचे पात्र काश्मीर मध्ये दहशतवादी गटांमध्ये घुसखोरी करणारा भारतीय लष्करी अधिकारी मेजर मोहित शर्मावर आधारित असल्याची अफवा पसरली होती, परंतु आदित्य धर यांनी हा दावा फेटाळून लावला.[१६][१७] नोव्हेंबर २०२५ मध्ये, सौम्या टंडनने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर आली.[१८]
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, दिवंगत भारतीय सैनिक मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली. निर्मात्यांनी कुटुंबाची संमती न घेता शर्मा यांच्या जीवनातून आणि गुप्त कारवायांमधून प्रेरणा घेतल्याचा आरोप केला.[१९][२०] दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) ला या आक्षेपांवर विचार करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर बोर्डाने चित्रपटाची नवीन तपासणी केली आणि त्यांना मेजर मोहित शर्माशी कोणताही संबंध आढळला नाही.[२१] त्याचप्रमाणे, चौधरी अस्लम यांच्या विधवा, नौरीन अस्लम यांनी देखील चित्रपटात त्यांच्या पात्राच्या चित्रणावर आक्षेप घेतला आणि जर त्यांच्या पतीचे चुकीचे चित्रण केले गेले तर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.[२२] गुजरातमधील जुनागढ येथील मकरानी बलोच समुदायाने देखील या चित्रपटात चौधरी अस्लम यांच्या पात्राने बोललेल्या बलोचविरोधी ओळींसाठी निषेध केला आणि चित्रपट निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.[२३][२४]
मार्केटिंग
[संपादन]६ जुलै २०२५ रोजी सिंग यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्याच दिवशी[२५][२६] या चित्रपटाचे टीझरही प्रदर्शित करण्यात आले, ज्यामध्ये जास्मिन सँडलास यांच्या आवाजातील एक गाणे आहे. या साउंडट्रॅकमध्ये हनुमानकाइंड यांचा एक रॅप सेगमेंट देखील आहे.[२७] हे ट्रेलर मूळतः १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होते, परंतु २०२५ च्या दिल्ली कार स्फोटामुळे, पुढे ढकलण्यात आले.[२८] हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२५ रोजी 'नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात' झालेल्या लाँच कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला.[२९] हा ऑडिओ लाँच १ डिसेंबर २०२५ रोजी झाला.[३०]
प्रदर्शन
[संपादन]हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.[३१] या चित्रपटाला तीव्र हिंसाचारासाठी सीबीएफसीकडून ए (फक्त प्रौढांसाठी) प्रमाणपत्र मिळाले, तसेच काही हिंसक दृश्ये आणि अपशब्द देखील कमी करण्यात आले. हा चित्रपट जीसीसीच्या देशांमध्ये बंदी घालण्यात आला. पाकिस्तानविरोधी भावनांमुळे धुरंधर सर्व आखाती देशांमध्ये बंदी आहे [३२]
या चित्रपटाचे दोन्ही भागांचे डिजिटल स्ट्रीमिंग हक्क नेटफ्लिक्सने ₹१३० कोटींना विकत घेतले.[३३]
बॉक्स ऑफिस
[संपादन]१२ डिसेंबर २०२५ पर्यंत, अर्थात पहिल्या आठवड्यात धुरंधरने देशांतर्गत
३००.८३ कोटी (US$६६.७८ दशलक्ष) कमावले, तर जगभरात
७३.७७ कोटी (US$१६.३८ दशलक्ष) आणि एकत्रित
३७४.६० कोटी (US$८३.१६ दशलक्ष) इतकी कमाई केली.
पुढील भाग
[संपादन]सुरुवातीला एकाच चित्रपटाचे नियोजन असलेला धुरंदर अखेर दोन भागात विभागला गेला.[३४] चित्रपटाच्या पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये 'धुरंदर भाग २' चा सिक्वेल दाखवला आहे, ज्यामध्ये पहिल्या भागाच्या शेवटी घडलेल्या घटनांचा शोध घेतला आहे, तसेच १९ मार्च २०२६ रोजी हा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.[४][३५]
संदर्भ
[संपादन]- ↑ Biswas, Sneha (7 July 2025). "Meet Dhurandhar full cast: Sara Arjun, Sanjay Dutt, Akshaye Khanna, Arjun Rampal in Ranveer Singh's upcoming film". मिंट (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ Ray, Sanjana (19 November 2025). "Dhurandhar release date, cast, characters, true story and everything else you need to know". GQ India (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Inside Operation Lyari, Pakistan's crackdown on gangs, which inspired Ranveer Singh's 'Dhurandhar'". First Post. 20 November 2025. 29 November 2025 रोजी पाहिले.
- 1 2 "Dhurandhar hits theatres: Second part of Ranveer's film to release on this date". India Today. 5 December 2025 रोजी पाहिले.
- ↑ Biswas, Sneha (7 July 2025). "Meet Dhurandhar full cast: Sara Arjun, Sanjay Dutt, Akshaye Khanna, Arjun Rampal in Ranveer Singh's upcoming film". मिंट (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ Ray, Sanjana (19 November 2025). "Dhurandhar release date, cast, characters, true story and everything else you need to know". GQ India (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Aditya Dhar's untitled film starring Ranveer Singh sparks speculation about being inspired by real-world events". Bollywood Hungama. 17 March 2025. 17 March 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Ranveer Singh's Dhurandhar brings to focus Lyari's past of political-crime nexus". India Today. 28 November 2025 रोजी पाहिले.

- ↑ "Dhurandhar not based on Mohit Sharma's life, says Aditya Dhar: The soldier who shot terrorists point-blank with their own weapon". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 28 November 2025. 28 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Exclusive: Jab We Met actress Saumya Tandon on returning to the big screen with Dhurandhar". The Times of India. 24 November 2025. ISSN 0971-8257. 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ Biswas, Sneha (7 July 2025). "Meet Dhurandhar full cast: Sara Arjun, Sanjay Dutt, Akshaye Khanna, Arjun Rampal in Ranveer Singh's upcoming film". मिंट (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ Ray, Sanjana (19 November 2025). "Dhurandhar release date, cast, characters, true story and everything else you need to know". GQ India (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ Biswas, Sneha (7 July 2025). "Meet Dhurandhar full cast: Sara Arjun, Sanjay Dutt, Akshaye Khanna, Arjun Rampal in Ranveer Singh's upcoming film". मिंट (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ Ray, Sanjana (19 November 2025). "Dhurandhar release date, cast, characters, true story and everything else you need to know". GQ India (इंग्रजी भाषेत). 29 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Aditya Dhar's untitled film starring Ranveer Singh sparks speculation about being inspired by real-world events". Bollywood Hungama. 17 March 2025. 17 March 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Ranveer Singh's Dhurandhar brings to focus Lyari's past of political-crime nexus". India Today. 28 November 2025 रोजी पाहिले.
- ↑ "'Dhurandhar' first look: Ranveer Singh is all swag in Aditya Dhar film; Sanjay Dutt, R. Madhavan, Akshaye Khanna, Arjun Rampal also featured". हिंदुस्तान टाइम्स. 6 July 2025. 6 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ "The mood, the styling, the silence: Ranveer Singh's first look from Dhurandhar sets the tone for the biggest film of the year". Firstpost. 6 July 2025. 6 July 2025 रोजी पाहिले.