धरमतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धरमतर [१] भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यात असलेले अतिशय छोटे बंदर आहे. ते अंबा नदीमुळे बनलेल्या धरमतर खाडीच्या उजव्या काठावर नदीच्या मुखापासून १६ किलोमीटर आत आहे. ही खाडी अंबा नदी, कारंजा खाडीपाताळगंगा नदी यांचा संगम आहे. मुंबई खाडीच्या पलीकडे व नाव्हा शेवा ह्या मोठ्या बंदरापासून २६ किलोमीटर असलेले धरमतर हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील वडखळ नाक्यापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. ते रस्ता व रेल्वे ह्या दोन्ही तऱ्हेने बंदराशी जोडलेले आहे.

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून धरमतर पर्यंत ३६ किलोमीटर पोहून जाणे हे लांब पल्ल्याच्या पोहणाऱ्यांना एक आव्हान असते[२]. विशेषतः ज्यांना इंग्लिश खाडी पोहायची असते त्यांच्या उमेदवारीसाठी ही एक महत्त्वाची पायरी असते. मिहीर सेन ह्या प्रसिद्ध जलतरण पटूने प्रथम धरमतर आणि मग इंग्लिश खाडी पार केल्यावर ह्या आव्हानाना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक पोहाणाऱ्यांनी हा लांब पल्ला पोहून दाखविला आहे व त्यात १० ते २० वर्षे गटातली मुले व मुलीही आहेत. राष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रभू ही धरमतर पोहणारी पहिली महिला होती.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "इंग्रजी विकीपेडियावर Dharamtar हा लेख्" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "टाईम्स ऑफ इंडिया, ८-मार्च-२०१४, बी बी नायक लिखित बातमी 'न्यू युंग ...'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)