धनश्री लेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


कार्यक्रमांचे रसाळ शैलीतले अभ्यासपूर्ण निवेदन करण्यार्‍या धनश्री लेले या कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल ओळखल्या जातात. शालेय जीवनात राज्यस्तरीय गीता पाठांतर स्पर्धेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम बक्षिस मिळाले होते. मुंबई विद्यापीठात त्या एम.ए.(संस्कृत)ला पहिल्या आल्या होत्या. त्यांना त्यावेळी सुवर्णपदक मिळाले होते.

धनश्री लेले यांचा जर्मन आणि उर्दू या भाषांचाही अभ्यास आहे.

संस्कृत साहित्याबरोबरच मराठी काव्य, संतसाहित्य या विषयांचा धनश्री लेले यांचा व्यासंग आहे. मनाचे सौंदर्य, गुरू - एक संकल्पना, भर्तृहरीची नीतिशतके या विषयांवर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.

धनश्री लेले थोड्याफार कवयित्री आहेत. त्यांनी रचलेल्या कोजागिरीसंदर्भातील व होळीसंदर्भातील बंदिशींना गायकांनी रागदारी संगीतात बद्ध केले असून त्यांचे मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर येथील काही ठिकाणी कार्यक्रमही सादर झाले आहेत.

धनश्री लेले यांची अनेक मान्यवरांसोबत व्याख्याने झाली आहेत. त्यासाठी त्यांना सावरकरांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे.

धनश्री लेले यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • पहिला स्वातंत्र्यवीर शब्दप्रभू पुरस्कार
  • कार्यक्रमांचे लेखन, निवेदन यांसाठी दिला गेलेला पहिला रामुभय्या दाते पुरस्कार (३-८-२०१५)